Thursday, 9 September 2021

 नाशिक विभाग-

आसखेडा विद्यालयात शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा

पर्यावरण रक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना निर्माण व्हावे व कलेची आवड निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा ता.बागलाण जि.नाशिक येथ शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा दिनांक ०८-०९-२०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुबक गणेश मूर्ती साकारण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य मा. चौरे पी.बी. यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण सेवा योजना प्रमुख ठाकरे जे.एन. उपस्थित होते तसेच पर्यावरण सेवा योजना नाशिक विभागाचे प्रकल्प अधिकारी माननीय जगदीश ठाकुर यांच्या सौजन्याने सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उपलब्द करून देण्यात आले.
सदर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आवड निर्माण होऊन यातून मोठे कलाकार होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विद्यालयात राबविण्यात येणारा सदर उपक्रम प्रशंसनीय आहे. या विषयी प्रत्येकाने काळजी घेतल्यास जलप्रदूषण कमी करण्यास मदत होईल असे योजना प्रमुख ठाकरे यांनी यावेळी नमूद केले तसेच नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याविषयी देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात परीक्षक गांगुर्डे बी.जे., कनोज एन.व्ही., गावीत एस.एस., पगार एस.एस. यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींचे परीक्षण करून प्रथम तीन क्रमांकाचे मूर्तींचे निवड करून विजेते प्रथम क्रमांक कु. तेजस्विनी कापडणीस, द्वितीय क्रमांक. कु.धनश्री शिंदे व तृतीय क्रमांक चि. भविष्य सोनवणे या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करण्यात आले.



Friday, 28 May 2021

नाशिक विभाग- उपक्रम क्रमांक-१९ - रानभाजी

उपक्रमाचे नाव- रानभाजी अभ्यास व पाककृती

शेती किंवा शेतीची निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात
त्याअनुषंगाने रानभाजी उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. शेतामध्ये, शेताच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला तसेच जंगलात अनेक रानभाज्या वेगवेगळ्या ऋतू मध्ये येत असतात, त्याची माहिती पत्रकात विद्यार्थ्यांना माहिती पाठवण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरात आढळणारी रानभाजी बाबत माहिती संकलित केली आहे.
१.रानभाजी/कंदाचे नावे
२.रानभाजी पाककृती - भाजी तयार करण्याची पद्धती.











Tuesday, 30 March 2021

बर्ड रेस्टारंट आणि पाणपोई- नाशिक विभाग

 नाशिक विभाग

उपक्रम क्रमांक-१६

उपक्रमाचे नाव- बर्ड रेस्टारंट आणि पाणपोई
कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना आठवडेनिहाय उपक्रम नेमून देण्यात आला, विद्यार्थ्यांनी घराच्या आजूबाजूला पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाणी उपलब्ध करून दिले आहे.
त्याचबरोबर पाणपोई वर आलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी घेण्यात आल्या.
त्यासाठी विद्यार्थ्यांना ई-बुक (पीडीएफ) बुक आणि पक्ष्यांसाठी बर्ड रेस्टारंट आणि पाणपोई बाबत माहितीपत्रक पाठवण्यात आले होते.
१.पक्ष्यांसाठी ठेवलेले खाद्य पेटी- (बर्ड रेस्टारंट) चा फोटो.
२.पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी पिण्यासाठीचे भांडे चा फोटो
३.पक्षी निरीक्षण केलेल्या नोंदवहिचा फोटो विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, शाळेचे नाव तालुका जिल्हा सह विद्यार्थ्यांना पर्यावरण सेवा योजनेच्या व्हाटस अप ग्रुप वर अद्यावत करण्यात आले आहे.













Friday, 5 March 2021

नाशिक विभाग- उपक्रमाचे नाव- परिससरात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या नोंदी घेणे

नाशिक विभाग

उपक्रम क्रमांक-१५ उपक्रमाचे नाव- परिससरात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या नोंदी घेणे कोविड-१९ च्या कालावधीत आपण सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबवित आहोत त्यानुसार विद्यार्थ्यांनी घराच्या आसपास आढळणाऱ्या फुलपाखरांच्या नोंदी घेतल्या आहेत. घराच्या आसपास आढळणारे फुलपाखरू बाबत निरीक्षण करून खालील दिलेल्या ई-बुक (पीडीएफ) बुक वरून परिसरात आढळणाऱ्या फुलपाखरू प्रजातींच्या नोंदी खालील पाठवलेल्या फॉरमॅट मध्ये विद्यार्थ्यांनी नोंदाल्या आहेत व फोटो ग्रुप वर पाठवले आहे. Butterfly e-book by Dr.Raju kasambe,BNHS Mumbai https://www.researchgate.net/publication/326098762_Butterflies_of_Western_Ghats_Second_Edition_2018_-3_Final




नाशिक विभाग- परिसरात आढळणारे पक्षी निरीक्षण नोंदी

नाशिक विभाग

उपक्रम क्रमांक-१४ उपक्रमाचे नाव- जैववीविधता नोंदवही तयार करणे कोविड-१९ च्या कालावधीत आपण सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबवित आहोत त्यानुसार आपल्या घराच्या आसपास असलेल्या जैवविवीधता नोंदी करायच्या आहेत. परिसरात आढळणारे पक्षी निरीक्षण नोंदी बाबत विद्यार्थ्यांना तक्ता देण्यात आला, त्यानुसार विद्यार्थ्यानी पक्षी निरीक्षण केले आहे. सोबत एक पी डी एफ ई-बुक डॉ. राजू कसंबे, बी.एन एच.एस मुंबई यांनी तयार केलेले आहे. त्याचाा आधार घेऊन. यामध्ये १०० कॉमनली आढळणारे बर्डस् चे फोटोस आणि माहिती विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलीे होती . पुस्तकाचे वाचन करून, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात यापैकी कोणते बर्डस आढळतात याबाबत नोंदी घेऊन माहिती पाठवली आहे. Dr.Raju Kasambe https://www.researchgate.net/publication/343218657_100_Common_Birds_in_India





Tuesday, 19 January 2021

नाशिक विभाग- उपक्रमाचे नाव- विद्युत मीटर वाचन अभ्यास

 पक्रम क्रमांक-१२

उपक्रमाचे नाव- विद्युत मीटर वाचन अभ्यास

कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत. कुटुंबाचे विद्युत मीटर वाचन अभ्यास करून खालील माहिती पत्रकामधील माहितीचे वाचन करून माहिती भरून पाठवली आहे.









Friday, 1 January 2021

उपक्रमाचे नाव- प्लॅस्टिक अभ्यास व प्रश्नावली

 नाशिक विभाग

उपक्रम क्रमांक-११

उपक्रमाचे नाव- प्लॅस्टिक अभ्यास व प्रश्नावली
कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत, त्यानुसार कुटुंबाचे प्लॅस्टिक सर्वेक्षण प्रश्नावलीद्वारे अभ्यास सोबत दिलेल्या करून प्रश्नावली मध्ये माहिती भरून पाठवली आहे.