पर्यावरण सेवा योजने अंतर्गत कोंढार चिंचोलीच्या
विद्यार्थ्यांनी साजरी केली पर्यावरणपूरक रंगपंचमी
रंगपंचमी म्हणजेच रंगाचा सण, रंगांची मुक्त उधळण यामध्ये लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा,निळा असे विविध रंग येतात. आपण सर्वजण खूप उत्साहाने रंगपंचमी साजरीकरतो.
रंगपंचमीचा सण पूर्वापारापासून साजरा केला जातो. पूर्वी रंगपंचमी साजरी करण्याकरिता नैसर्गिक व आयुर्वेदिक रंगांचा वापर केला जात होता. कोरड्या रंगाला ‘गुलाल’ तर रंगीत पाण्याला ‘रंग’ असे म्हणत. असे नैसर्गिक रंग घरच्या घरीच बनविले जात. नैसर्गिक रंग लावल्यानंतर एकदा पाण्याने धुतले कि सगळा रंग निघून जायचा. असे रंग बनविण्यासाठी प्रामुख्याने पळस, पांगारा, जास्वंद, झेंडूची फुले, बीट, हळद, मेहंदीची पाने, डाळीचे पीठ यासारख्या घटकांचा वापर केला जात होता.
काळ बदलत गेला तसा रंगपंचमी साजरी करण्याची पद्धतही बदलत गेली. नैसर्गिक घटकापासून तयार केलेल्या रंगाची जागा आता रासायनिक रंगानी घेतली. नैसर्गिक रंगाच्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रास विकले जावू लागले आहेत. ओले रंग, पेस्ट, पावडर, आणि वार्निशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. रंगपंचमी
साजरी करताना आपण रासायनिक रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.
रासायनिक रंगामध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्साईड, कॉपर सल्फेट, अॅल्यूमिनिअम ब्रोमाईड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रासायानामुळेच हे रंग गडद होतात व दीर्घकाळ टिकतात.
वास्तविक पाहता काही रंगांच्या डब्ब्यावर ‘केवळ औद्योगिक उपयोगासाठी’ असा स्पष्ट उल्लेख असतो. कृत्रिम रंगांचे काही परिणाम तत्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने दिसून येतात. यामध्ये तात्पुरता आंधळेपण, चेहऱ्यावर पुरळ येणे, त्वचेला खाज येणे याचबरोबर डोळ्यांची जळजळ होणे यासारखे परिणाम होतात. याचबरोबर कृत्रिम रंग सांडपाण्याच्या माध्यमातून पाण्यात मिसळून पाणी प्रदुषित करू शकतात.
सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघत आहे. सर्वत्रपाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. रंग खेळताना पाण्याचा अपव्यव पण खूप होतो.
या सर्व बाबींचा अभ्यास जि.प. कोंढार चिंचोली ता.करमाळा, जि. सोलापूर शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण सेवा योजने अंतर्गत केला.यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांनी केलेल्या संकल्पाला पर्यावरण सेवा योजनेचे योजना प्रमुख बोडखे सर यांनी प्रत्यक्ष कृतीची साथ दिली.
विद्यार्थ्यांनी हळद, बीट, मेहंदी व अरारूट पावडर वापरून रंग बनविले. यामध्ये हळदीपासून पिवळा, बीटापासून गुलाबी व मेहंदीपासून काळा रंग बनविले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेले रंग वापरून रंगपंचमी साजरी केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी ओला व कोरडा असे दोन्हीही प्रकारचे रंग बनविले.
रंग खेळून झाल्यावर विद्यार्थ्यांनी चेहरापाण्याने स्वच्छधुतला यानंतर विद्यार्थ्यांच्या असे लक्षात आले कि नैसर्गिक रंग वापरल्यामुळे त्यांची त्वचा आणखीनच उजळली. नैसर्गिक रंगाचे दुष्परिणाम होत नसून त्याचा फायदाच आहे असे विद्यार्थ्यांना लक्षात आले, शिवाय रंग बनविण्यासाठी लागणारे साहित्य परिसरातूनच उपलब्ध होते. नैसर्गिक
रंग स्वतः बनवून वापरण्याचा विद्यार्थ्यांना अनुभव व आनंद नवीनच होता.
विद्यार्थ्यांना सदर उपक्रमास मुख्याध्यापक इवरे व्ही.एल, योजना प्रमुख बोडखे बी.पी. यांचे मार्गदर्शन मिळाले.
 |
Add caption |
 |
नैसर्गिक रंग बनविताना योजनेतील विद्यार्थी व योजना प्रमुख श्री. बोडखे बी.पी. |
 |
नैसर्गिक रंग खेळण्याचा मनमुरादपणे आनंद घेताना विद्यार्थी |