पर्यावरण विभाग पुरस्कृत, पर्यावरण सेवा योजना अंतर्गत,
यु.एन.इ.पी
(United
Nations Environment Program) ने २०१८ ला ५
जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी
साठी ‘Beat Plastic Pollution’ या विषयांतर्गत
भारताला यजमानपद मिळाले असून त्याबाबत संपूर्ण जगाला प्रतिनिधित्व केले आहे,याच
अनुषंगाने मा.अवर सचिव, श्री. संजयजी संदनशिवे, पर्यावरण
विभाग,महाराष्ट्र
शासन
यांनी आदर्श विद्यालय वरोडा, पो. ब्राम्हणी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर
या शाळेला दि.१७ जुलै २०१८ रोजी विशेष भेट देऊन नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षकांसाठी “प्लॅस्टिक
मुक्त शाळा व गाव परिसर” या
विषयांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन
मा. अवर सचिवांच्या हस्ते सरस्वतीच्या मूर्तीची पूजा व दीप प्रज्वलन करून
झाले.यामध्ये लोकसमुदायाबरोबर काम करताना प्लॅस्टिक कचरा आणि त्याचे धोके,त्याचे
व्यवस्थापन आणि विल्लेवाट,प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाची भूमिका,शासनाने
निर्गमित केलेला शासन निर्णय (जी.आर) तसेच कोणकोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिक
पिशव्या आणि वस्तूंवर बंदी आहे याबाबत सविस्तर माहिती दिली.प्लॅस्टिक बंदी हि
जोपर्यंत लोकचळवळ होत नाही तोपर्यंत प्लॅस्टिक बंदी शक्य नाही असे मत त्यांनी
व्यक्त केले. प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीचा महाराष्ट्र शासनाचे प्लॅस्टिक बंदी
विषयी माहिती साठी पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे मार्फत तयार केलेली प्लॅस्टिक
विषयक हस्तपुस्तिका योजना प्रमुखांना देण्यात आले.
पर्यावरण
सेवा योजनेला सात वर्ष पूर्ण झाले असून सद्यस्थितीला संपूर्ण महाराष्ट्रातील
पर्यावरण सेवा योजनेतील शाळा व गाव परिसरात विविध नाविन्यपूर्ण कृती उपक्रम
राबविण्यात आले आहे. सदर उपक्रमांची दखल घेत श्री. संजयजी संदनशिवे यांनी
योजनेच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आदर्श मानकर विद्यालयास या शाळेला भेट
देवून योजने अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी
गट निहाय मा. अवर सचिवांसमोर सादरीकरण केले. प्रथम विद्यार्थी गटाने पर्जन्यमापक
यंत्र,पर्जन्य
नोंदी,
सर्वात
जास्त आणि कमी पडलेला पाऊस याबाबत माहिती दिली.पर्जन्यमापकाच्या विविध भागाची
शास्त्रीय माहिती ऐकून मा. अवर सचिवांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दुसऱ्या
गटाने निर्माल्यापासून खत तयार करणे गणेश मंडळाकडून निर्माल्या संकलन, तिसऱ्या
गटाने शाळा परिसरात तयार केलेल्या रोपवाटिकेबाबत विद्यार्थ्यांनी बीज संकलन, बीज साठवणूक, बीज
प्रक्रिया,उगवण क्षमता
अभ्यासणे,
नोंदी
याबाबत सादरीकरण केले.चौथ्या गटाने शाळा परिसरात गांडूळ खत प्रकल्प सादरीकरण केले, यामध्ये
गांडूळ खताच्या बेडबाबत शेण व पालापाचोळ्याचा थर,कोणत्या
जातीचे गांडूळ वापरले आहे याबाबत सादरीकरण केले. कमी खर्चात तयार होत असलेला
गांडूळ खत उपक्रम पाहून मा. अवर सचिवांनी शाळेचे व विद्यार्थ्यांची कौतुक केले.
कार्यशाळेच्या ठिकाणी योजने अंतर्गत नागपूर व अमरावती विभागातील शाळांनी
राबविलेल्या उपक्रमांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती.माहिती मॉडेल, अहवाल, कंपोस्ट खत, टाकावू पासून
टिकावू वस्तू,
बीज
संकलन,
गाव
स्तरावर राबविलेल्या उपक्रमाचे अहवाल व फोटो, शिक्षकांचे
मासिक अहवाल,
शाळानिहाय
फाईल,
माल
साठा नोंदवही यांचा समावेश होता.
नागपूर व अमरावती विभागातील निवडक ७
योजनाप्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.त्यांच्या शाळेमध्ये घेतलेल्या उपक्रमाचा
अहवाल,
छायाचित्र, गाव पर्यावरण
सद्य स्थिती अहवाल, टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या वस्तू,उपक्रम नोंद
वही पुस्तिका व मालसाठा नोंद वही, शाळा व गाव परिसरात राबविण्यात
येणाऱ्या उपक्रमाची माहिती व टप्पे याबाबत योजना प्रमुखांनी सविस्तर माहिती अवर
सचिवांना दिली. योजनेत सहभाग झाल्यापासून विद्यार्थी व शिक्षक म्हणून झालेल्या
सकारात्मक बदलाबाबत माहिती दिली. गावाच्या माजी सरपंच श्रीमती.कल्पना डाखोळे यांनी
योजना गाव परिसरात राबविल्यामुळे गावकऱ्यांमध्ये झालेल्या बदलाची माहिती दिली.
यामध्ये अवर सचिवांनी मुख्याध्यापक, योजना प्रमुख व माजी सरपंचांशी चर्चा
करून योजना शाळा व गाव स्तरावर कशा प्रकारे राबविली जाते याची माहिती
घेतली.शिक्षकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या,शासन स्तारावर
त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असा विश्वास दिला. पर्यावरण सेवा
योजनेचे उपक्रम अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाची सांगता मा. अवर
सचिवांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली.सदर कार्यशाळेसाठी
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानकर यांनी कार्यशाळा आयोजित करून सहकार्य
केले. योजना प्रमुख श्रीमती. अनिता तोमर यांनी कार्यशाळेचे व्यवस्थापन केले,शाळेचे
सहशिक्षक,विद्यार्थांनी
मोलाचे योगदान दिले,सूत्र संचालन श्री.पडोळे यांनी केले.नागपूर
विभागाचे समन्वयक श्री.भिमाशंकर ढाले यांनी कार्यक्रम घडवून आणला, पुणे विभागचे
समन्वयक श्री.गणेश सातव यांनी नियोजन आणि समन्वयन केले,अमरावती
विभागाच्या समन्वयिका केतकी पाटील यांनी व्यवस्थापन केले.श्रीमती.अनिता तोमर यांनी
आभार मानले.
 |
पर्जन्यमापकाद्वारे पाऊस मोजण्याचा उपक्रम मा.संजय संदानशिवे अवर सचिव , पर्यावरण विभाग यांना दाखविताना विद्यार्थी,शिक्षक | | | |
|
 |
मा. सचिवांना गांडूळखत प्रक्रिया सांगताना विद्यार्थी |
 |
नागपूर विभागातील शाळेच्या उपक्रम फाईल व तयार करण्यात आलेल्या वस्तू पाहताना मा. सचिव व योजना प्रमुख श्रीमती तोमर मॅडम |
 |
शालेय उपक्रमाविषयी माहिती देताना योजना श्री. इंगळे सर |
 |
नागपूर व अमरावती विभागातील शिक्षांकाना मार्गदर्शन व त्याच्या योजनेविषयीच्या अडचणी समजून घेताना मा. सचिव सर |
 |
वृक्षारोपण करताना मा. अवर सचिव श्री. संजय संदनशिवे सर |