नाशिक विभाग
उपक्रम क्रमांक-१६
उपक्रमाचे नाव- बर्ड रेस्टारंट आणि पाणपोई
कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांना आठवडेनिहाय उपक्रम नेमून देण्यात आला, विद्यार्थ्यांनी घराच्या आजूबाजूला पक्ष्यांसाठी खाद्य आणि पाणी उपलब्ध करून दिले आहे.
त्याचबरोबर पाणपोई वर आलेल्या पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी घेण्यात आल्या.
त्यासाठी विद्यार्थ्यांना ई-बुक (पीडीएफ) बुक आणि पक्ष्यांसाठी बर्ड रेस्टारंट आणि पाणपोई बाबत माहितीपत्रक पाठवण्यात आले होते.
१.पक्ष्यांसाठी ठेवलेले खाद्य पेटी- (बर्ड रेस्टारंट) चा फोटो.
२.पक्ष्यांसाठी ठेवलेले पाणी पिण्यासाठीचे भांडे चा फोटो
३.पक्षी निरीक्षण केलेल्या नोंदवहिचा फोटो विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, शाळेचे नाव तालुका जिल्हा सह विद्यार्थ्यांना पर्यावरण सेवा योजनेच्या व्हाटस अप ग्रुप वर अद्यावत करण्यात आले आहे.