उपक्रमाचे नाव- रानभाजी अभ्यास व पाककृती
शेती किंवा शेतीची निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात
त्याअनुषंगाने रानभाजी उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. शेतामध्ये, शेताच्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला तसेच जंगलात अनेक रानभाज्या वेगवेगळ्या ऋतू मध्ये येत असतात, त्याची माहिती पत्रकात विद्यार्थ्यांना माहिती पाठवण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरात आढळणारी रानभाजी बाबत माहिती संकलित केली आहे.
१.रानभाजी/कंदाचे नावे
२.रानभाजी पाककृती - भाजी तयार करण्याची पद्धती.