Thursday, 9 September 2021

 नाशिक विभाग-

आसखेडा विद्यालयात शाडू गणपती मूर्ती कार्यशाळा

पर्यावरण रक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना निर्माण व्हावे व कलेची आवड निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा ता.बागलाण जि.नाशिक येथ शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा दिनांक ०८-०९-२०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सुबक गणेश मूर्ती साकारण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य मा. चौरे पी.बी. यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण सेवा योजना प्रमुख ठाकरे जे.एन. उपस्थित होते तसेच पर्यावरण सेवा योजना नाशिक विभागाचे प्रकल्प अधिकारी माननीय जगदीश ठाकुर यांच्या सौजन्याने सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उपलब्द करून देण्यात आले.
सदर उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आवड निर्माण होऊन यातून मोठे कलाकार होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने विद्यालयात राबविण्यात येणारा सदर उपक्रम प्रशंसनीय आहे. या विषयी प्रत्येकाने काळजी घेतल्यास जलप्रदूषण कमी करण्यास मदत होईल असे योजना प्रमुख ठाकरे यांनी यावेळी नमूद केले तसेच नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याविषयी देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात परीक्षक गांगुर्डे बी.जे., कनोज एन.व्ही., गावीत एस.एस., पगार एस.एस. यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींचे परीक्षण करून प्रथम तीन क्रमांकाचे मूर्तींचे निवड करून विजेते प्रथम क्रमांक कु. तेजस्विनी कापडणीस, द्वितीय क्रमांक. कु.धनश्री शिंदे व तृतीय क्रमांक चि. भविष्य सोनवणे या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करण्यात आले.