स्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
Tuesday, 22 April 2014
Tuesday, 8 April 2014
कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशाला,पुणे येथील विद्यार्थिनी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करताना
बाजारात मिळणाऱ्या रंगामध्ये वेगवेगळी रसायने वापरलेली असतात. त्यामुळे त्वचा
खराब होणे, डोळ्यांना इजा होणे, केसावर परिणाम होणे या गोष्टी घडतात. तसे होवू नये
म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी आनंदात साजरी करण्याची राठी प्रशालेच्या विद्यार्थिनीनी ठरविले.
विद्यार्थिनीनी खालील प्रमाणे नैसर्गिक रंग तयार केले.
· हिरवा रंग –
विद्यार्थिनीनी पालक, कोथिंबीर व गुलमोहराच्या वाळलेल्या पानापासून हिरवा रंग
बनविला.
· पिवळा रंग - दोन चमचे हळद व चार चमचे बेसन पीठ एकत्र करून
पिवळा रंग (कोरडा) बनविला, तसेच झेंडूची फुले पाण्यात उकळून ओला पिवळा रंग बनविला.
· लाल रंग – लाल
फुले वाळवून कोणत्याही पिठात मिसळल्यास कोरडा लाल रंग तर लाल डाळींबापासून ओला लाल
रंग तयार केला.
· किरमिजी रंग – बीट किसून एक लिटर पाण्यात मिसळणे ते मिश्रण उकळून रात्रभर तसेच ठेवल्यास
किरमिजी रंग तयार होतो.
· केशरी रंग –
पळसाची फुले वळवून पूड केल्यास कोरडा केशरी रंग मिळतो, पळसाची फुले रात्रभर
पाण्यात भिजवून किंवा उकल्यास सुगंधी केशरी रंग मिळतो.
· काळा रंग –
वाळलेल्या आवळ्याची फळे लोखंडाच्या भांड्यात उकळा आणि रात्रभर तशीच ठेवल्यास काळा
रंग मिळतो.
· निळा रंग –
नीलमोहोरची फुले वळवून त्यापासून निळा कोरडा रंग बनविला जातो.
· तपकिरी रंग –
विड्याचे पानात वापरण्यात येणारा कात पाण्यात मिसळल्यास ओला तपकिरी रंग मिळतो.
ह हा उपक्रम विद्यार्थिनीनी पर्यावरण सेवा योजना गटापुरता मर्यादित न ठेवता, याबाबतची माहिती प्रशालेतील इतर विद्यार्थीनीना दिली व पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले.
सदर उपक्रम राबविण्याकरिता पर्यावरण सेवा योजनेच्या योजना प्रमुख सौ. स्मिता
कुलकर्णी यांचे मार्गदर्शन विद्यार्थीनीना मिळाले. सदर अहवाल योजना प्रमुखांनी तयार
करून पर्यावरण शिक्षण केंद्रास सादर केला आहे.
Tuesday, 25 March 2014
नाशिक व जळगाव जिल्ह्यातील पर्यावरण सेवा योजनेतील विविध उपक्रम.
| देवठाण ता.दिंडोरी,जि.नाशिक येथील ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक पर्यावरणीय समस्या जाणून घेतांना जिल्हा समन्वयक. |
| इकोफ्रेंडली शाडू मातीचा गणपती दर्शविताना सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव |
| पुनर्चाक्रित कागद निर्मिती प्रातेक्षित करतांना सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव च्या विद्यार्थिनी. |
| गावातील ई-कचरा सर्वेक्षण व गोळा केल्यानंतरची सांखिकी माहिती सी.बी.निकुंभ हायस्कूल घोडगाव,ता.चोपडा,जि.जळगाव |
| सरपंच,सदस्य,ग्रामस्थ यांच्यासोबत संवाद साधतांना जिल्हा समन्वयक.भाऊसो.राजाराम गणू महाजन आदिवासी मा.वि.अभोडा,ता.रावेर,जि.जळगाव. |
| मी कोण आहे? हा खेळ खेळतांना विद्यार्थी,नूतन ज्ञान मंदिर अडावद,ता.चोपडा,जि.जळगाव |
Thursday, 20 March 2014
अब घर-घर नहीं फुदकती नन्हीं गौरैया
एक-दो दशक पहले लोगों के घर-आंगन में फुदकने वाली गौरैया आज विलुप्ति के कगार पर है। भारत में गौरैया की संख्या घटती ही जा रही है। इस नन्हें से परिंदे को बचाने के लिए प्रत्येक वर्ष 20 मार्च को विश्व गौरैया दिवस के रूप में मनाया जाता है।
पर्यावरण संरक्षण में गौरैया के महत्व व भूमिका के प्रति लोगों का ध्यान आकृष्ट करने तथा इस पक्षी के संरक्षण के प्रति जनजागरूकता उत्पन्न करने के इरादे से यह आयोजन किया जाता है। यह दिवस पहली बार वर्ष 2010 में मनाया गया था। वैसे देखा जाए तो इस नन्ही गौरैया के विलुप्त होने का कारण मानव ही हैं। हमने तरक्की तो बहुत की लेकिन इस नन्हें पक्षी की तरक्की की तरफ कभी ध्यान नहीं दिया। यही कारण है कि जो दिवस हमें खुशी के रूप में मनाना चाहिए था, वो हम आज इसलिए मनाते हैं कि इनका अस्तित्व बचा रहे।
वक्त के साथ जमाना बदला और छप्पर के स्थान पर सीमेंट की छत आ गई। आवासों की बनावट ऐसी कि गौरैया के लिए घोंसला बनाना मुश्किल हो गया। एयरकंडीशनरों ने रोशनदान तो क्या खिड़कियां तक बन्द करवा दीं। गौरैया ग्रामीण परिवेश का प्रमुख पक्षी है, किन्तु गांवों में फसलों को कीटों से बचाने के लिए कीटनाशकों के प्रयोग के कारण गांवों में गौरैया की संख्या में कमी हो रही है।
प्रकृति ने सभी वनस्पतियों और प्राणियों के लिए विशिष्ट भूमिका निर्धारित की है। इसलिए पर्यावरण संतुलन बनाए रखने के लिए आवश्यक है कि पेड़-पौधों और जीव-जन्तुओं को पूरा संरक्षण प्रदान किया जाए।
गौरैया के संरक्षण में इंसानों की भूमिका सर्वाधिक महत्वपूर्ण है। आवास की छत, बरामदे अथवा किसी खुले स्थान पर बाजरा या टूटे चावल डालने व उथले पात्र में जल रखने पर गौरैया को भोजन व पीने का जल मिलने के साथ-साथ स्नान हेतु जल भी उपलब्ध हो जाता है। बाजार से नेस्ट हाउस खरीद कर लटकाने अथवा आवास में बरामदे में एक कोने में जूते के डिब्बे के बीच लगभग चार सेंटीमीटर व्यास का छेद कर लटकाने पर गौरैया इनमें अपना घोंसला बना लेती है। सिर्फ एक दिन नहीं हमें हर दिन जतन करना होगा गौरैया को बचाने के लिए।
गौरैया महज एक पक्षी नहीं है, ये हमारे जीवन का अभिन्न अंग भी रहा है। बस इनके लिए हमें थोड़ी मेहनत रोज करनी होगी। छत पर किसी खुली छायादार जगह पर कटोरी या किसी मिट्टी के बर्तन में इनके लिए चावल और पीने के लिए साफ बर्तन में पानी रखना होगा। फिर देखिये रूठा दोस्त कैसे वापस आता है।
Wednesday, 19 March 2014
प्रगती विद्यालय रहाटगाव, ता.जि. अमरावती
२० मार्च जागतिक चिमणी दिवस,
गेल्या कित्येक शतकापासून मानववस्ती जवळ तसेच घरांच्या
आजूबाजूला मित्र बनून राहणाऱ्या चिमण्या गेल्या काही वर्षांंपासून कमी होत आहेत. चिमण्यांची संख्या का कमी होत आहे. चिमणी (House Sparrow) Passer domesticus ही प्रजाती जगभरात सर्वत्र परिचित आहे. वाढते औद्योगिकीकरण,
विकास आणि शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षात चिमण्यांची संख्या कमी झालली आले. तसेच मागील काही वर्षांत झालेल्या संशोधनानुसार मोबाईल
टाॅवर्स हे सुद्धा चिमण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. वाढती लोकसंख्या, सोबतच वाढते प्रदूषण, शेतात तसेच बागेत फवारली जाणारी किटकनाशके त्यामुळे बाधील होणारे चिमण्यांचे खाद्य, हा सुद्धा एक मोठा
धोका चिमण्यांची संख्या कमी व्हायला कारणीभूत आहे.
२० मार्च 'जागतिक
चिमणी दिवसा' निमित्त प्रगती विद्यालय रहाटगाव, ता. जि. अमरावतीच्या पर्यावरण
सेवा योजना विद्यार्था गटासोबातच ४१० विद्यार्थांनी एकत्र येऊन चिमणीची प्रतिकृती
तयार करून 'चिमणी वाचवा' हा संदेश दिला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चोपडे योजनाप्रमुख
श्री. विनोद लेव्हरकर, यांच्या सहकार्याने विद्यार्थांनी चिमणीची प्रतिकृती उभारली. या उपक्रमाला वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे
डॉ. जयंत वडतकर, श्री. वेद पत्की यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
Thursday, 13 March 2014
कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशाला, लक्ष्मी रोड, पुणे
पर्यावरण सेवा योजने अंतर्गत राठी प्रशालेच्या विद्यार्थिनीनी महात्मा फुले भाजी मंडईतील भाजी विक्रेते व ग्राहकांचा प्लास्टिक वापराबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे पुढचे पाऊल म्हणून प्रशालेच्या विद्यार्थिनीनी १५० कापडी पिशव्या बनवून भाजी विक्रेते व ग्राहकांना विकल्या, जेणेकरून प्लास्टिक वापर काही प्रमाणात कमी होईल, तसेच या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याकरिता विद्यार्थिनीनी ७०० कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. सदर उपक्रमात योजना प्रमुख सौ. स्मिता कुलकर्णी, मनीषा पाठक व पर्यावरण सेवा योजना गटाचा उत्साह उल्लेखनीय आहे.
Wednesday, 12 March 2014
Subscribe to:
Posts (Atom)





.jpg)