Tuesday, 9 May 2017


शाळेचे नाव - दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज, ता. करमाळा, जि. सोलापूर

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत बागल विद्यालयाने पक्ष्यांसाठी 'बर्ड रेस्टॉरंट' हा उपक्रम राबविलेला आहे. यामध्ये विद्यालय परिसर व गावामध्ये पक्ष्यांसाठी पाणी व खाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेने राबविलेल्या उपक्रमाची दाखल दै. संचारने घेवून याबाबत बातमी प्रसिद्ध केली.



Monday, 8 May 2017


उन्हाळ्यामध्ये माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तिथे पक्ष्यांचा व प्राण्यांचा कोण विचार करतय?
पर्यावरण सेवा योजने अंतर्गत काम करणाऱ्या दिगंबरराव बागल विद्यालय कुंभेज ता. करमाळा जि. सोलापूर येथील योजना प्रमुख श्री. कल्याणराव साळुंखे सर व विद्यार्थी पक्ष्यांना पाणी व अन्नाची सोय करण्यसाठी धडपडत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टी सुरु असताना सुद्धा कामाची जबाबदारी वाटून घेवून शिक्षक व विद्यार्थी काम करत आहेत.
सदर उपक्रमाची दखल दै. दिव्य मराठीने घेवून याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केली.



Tuesday, 11 April 2017

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पक्ष्यांसाठी घरटे बनविण्याची  तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

मार्चपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागते. चालू वर्षी तर मार्चमध्येच तापमानाने ४० अंश से ओलांडले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता खूप असते. उन्हाळ्यामध्ये पूर्ण सोलापूर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले असतो. माणसासाठी वैयक्तिक स्तरावर किंवा शासन स्तरावर पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते. परंतु पक्षी आणि प्राण्याना पाण्यासाठी असे कोणतेही नियोजन केले जात नाही. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळे किवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होवू शकतो.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आठ शाळामध्ये पर्यावरण सेवा योजना राबविली जाते. यातील दिगंबरराव बागल विद्यालयात गेल्या तीन वर्षापासून ‘बर्ड रेस्टॉरंट’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये उन्हाळ्या दरम्यान पक्ष्यांसाठी अन्न, पाणी (पिण्यासाठी व आंघोळीसाठी) व कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करणे असा उपक्रम राबविले जातो. दोन वर्षापूर्वी शाळेच्या परिसरात काही पक्षी मृत अवस्थेत आढळले. विद्यार्थ्यी व शिक्षकांनी पक्ष्यांच्या मृत्यूची चिकित्सा केली असता असे लक्षात आले कि पाण्याच्या दुर्भिक्षामुळेच पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व बाबींचा शिक्षकांनी चर्चा केली व पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करण्याचे ठरवले व इथूनच शाळेच्या ‘बर्ड रेस्टॉरंट’ उपक्रमाची सुरुवात झाली. सदर उपक्रम फक्त शाळेच्या परिसरात न राबविता विद्यार्थ्यांनी गावात हि प्रभावीपणे राबविला आहे.

तालुक्यामध्ये एका शाळेत सुरु असलेल्या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्याचा विचार डोक्यात आला. याचबरोबर शिक्षकांनी राबविलेले उपक्रम इतरानाही कळावेत व अशा प्रकरचे उपक्रम इतर शिक्षकांनी त्यांच्या शाळेतही राबवावेत यासाठी कुंभेज येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून दिगंबरराव बागल विद्यालयातील योजना प्रमुख श्री. कल्याणराव साळुंखे सर व विद्यार्थ्यांनी काम पाहिले.
कार्यशाळेसाठी करमाळा तालुक्यातील सहा शाळेतून १४ शिक्षक व ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना घरटे बनविण्याचे मार्गदर्शन करताना साळुंके सर

पक्ष्यांसाठी खाद्यपेटी बनविण्याचे मार्गदर्शन करताना श्री. साळुंके सर 


कार्यशाळेत प्रत्यक्ष घरटी बनविताना शिक्षक व विद्यार्थी





घरटे कशी बसवावीत याचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी

कार्यशाळेबाबत प्रतिक्रिया देताना विद्यार्थी

कार्यशाळेस उपस्थित असलेले शिक्षक व विद्यार्थी 

Wednesday, 5 April 2017



पर्यावरण सेवा योजने अंतर्गत जि.प. प्राथमिक शाळा कोंढार चिंचोली ता. करमाळा, जि. सोलापूर या शाळेने दिवाळी दरम्यान फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला. फटाके खरेदीसाठी लागणारे पैसे शाळेमध्ये गोळा केले, यामध्ये शिक्षकांनी स्वच्छेने मदत केली. जमा झालेल्या पैश्यातून शाळेतील हुशार पण आर्थिक स्थितीने जेमतेम असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त कपडे भेट दिले. शाळेने फक्त पर्यावरणपूरक उपक्रम राबविले नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार विद्यार्थ्यावर करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. 


पर्यावरण सेवा योजने अंतर्गत दिगंबरराव बागल विद्यालयामध्ये फुलपाखरू उद्यान तयार करण्यात आले आहे. सदर उपक्रमाची माहिती वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. 



पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामधील नऊ शाळामध्ये स्थानिक वाणाच्या बिया संकलित करून रोपवाटिका तयार करण्यात आली, त्याबाबतची बातमी वृत्तपत्राने प्रसिद्ध केली.