Tuesday, 20 February 2018

नूतन ज्ञान मंदिर अडावद ता.चोपडा जि. जळगाव निर्माल्य संकलन बातमी

दिनांक ०५ ऑक्टोबर २०१७ दैनिक पुण्य नगरी,जळगाव

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक


पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करणे- पळसे-नाशिक

पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना
शाळेचे नाव-माध्यमिक विद्यालय पळसे ता.जि. नाशिक
दिनांक-२४ ऑगस्ट २०१७
पर्यावरण पूरक सण- अंतर्गत शाडू माती आणि काळी मातीचा उपायोग करून गणेश मूर्ती इ.एस.एस गटाने प्रत्यक्ष कृतीतून तयार करून एक वेगळा आनंद मिळवला
कृती-१
पिंपळाच्या पानापासून गणेश प्रतिकुती तयार करण्यात अली.
कृती- २
काळ्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यात आली.यामध्ये इ.एस.एस च्या विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करून विविध आकाराचे सुबक गणेश मूर्ती तयार केली.
यामधून १ ते ४ सुबक मूर्ती तयार करणाऱ्या गटांना क्रमांक देण्यात आले.विजेत्यांना पर्यावरण पूरक माहिती असलेले पुस्तक देण्यात येणार आहे.
उद्देश हाच आहे की पर्यावरण पूरक बाबी आत्मसात व्हाव्या,विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैली अंगिकारल्या जावी.


स्व: कृतीचा आनंद आणि गुंगलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी


पिंपळ आणि गूळ भेंडी(परस पिंपळ) च्या पानापासून पर्यावरण पूरक गणेश प्रतिकृती

पिंपळाच्या पानापासून गणपती प्रतिकृती तयार करताना विद्यार्थी

तयार झालेले गणेश मूर्ती
Work is in progress

गोमुखेश्वर माध्यमिक विद्यालय,भिलवाड(मांगीतुंगी) ता.बागलाण जि-नाशिक




१)शाळेमध्ये पर्जन्य मापक बसवण्याचे प्रात्याक्षिक करण्यात आले.विद्यार्थ्यांना पर्जन्य मापक संकल्पना,पद्धती, काळजी,नोंदी घ्यावयाच्या पद्धती याविषयी माहिती देण्यात आली.
२)पर्जन्य मापकाची लेव्हल सपाट करूनच यंत्र फिक्स करणेसाठी गावातील बांधकाम मिस्तरी यांना बोलावले होते, ट्यूब लेवल च्या सहाय्याने काढून मगच पर्जन्य मापक बसवण्यात आले,विद्यार्थ्यांना याबाबत दिग्दर्शन देण्यात आले.
३)मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षकांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
४)विद्यार्थ्यांना पर्जन्य मापकाच्या नोंदी,तक्ता,स्तबालेख(आलेख),पाठ्यपुस्तक सहसंबंध याची सांगड घालण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांचे गट पाडून देण्यात आले

अर्थीयन अवॉर्ड कार्यशाळा,सटाणा जि. नाशिक

दिनांक ०५-०७-२०१७ रोजी अर्थीयन अवॉर्ड विषयी नाशिक जिल्ह्यातील ०९ शाळेंतीळ शिक्षक प्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
स्थळ -हॉटेल अवधूत ,बस स्टँड समोर सटाणा जि. नाशिक


१)कार्यशाळेचा उद्देश अर्थीयन पाणी सस्टेनेबिलिटी या विषयी
आराखड्यात दिल्या प्रमाणे Part A (Compulsory)- A1 to A5 उपक्रम आणि
Part A(Elective)
*Part B* Compulsory या सर्व उपक्रमाची उजळणी तसेच मागील वर्षी अर्थीयन राबवतांना आलेल्या अडचणी यावर जास्तीत जास्त चर्चा करण्यात आली.नाविन्यपूर्ण उपक्रम हे दिलेल्या फॉरमॅट च्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे हे निष्पन्न झाले.
२) अर्थीयन जल शाश्वतता अभियान राबवतांना काही शाळा A+ काही A तर काही B कॅटेगरी पर्यंत पोहचले होते,या वर्षी वेळ जास्त असल्याने अधिक गुणवत्तापूर्ण प्रकल्प राबवत येतील.
३)रेन गेज इन्स्ट्रुमेंट विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
पर्जन्य मापक बसवण्याची पद्धत,पाऊस मोजण्याचा कालावधी,काळजी,नोंदी,पावसाचे मोजमाप,प्रात्यक्षिक,गणितिय आकडेमोड,पाठ्यपुस्तक सहसंबंध याविषयी बिंदू जोडणे आणि माहितीचे विश्लेषण करण्यात आले.

Tuesday, 13 June 2017

रोपवाटिका – शिकण्याचा आनंद
शासनाने वर्ष २०१६ मध्ये २ कोटी रोप लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवले होते. त्यानुसार प्रत्येक शासकीय सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्याना ठराविक झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. याचबरोबर समाजात आता प्रसारमाध्यमातून झाडे लावण्याबाबतचे बरेचसे प्रबोधन होत आहे. यामुळे वर्षाच्या सुरुवातीला रोपे विकत घेवून त्यांची लागवड करण्यावर सर्वांचा भर असतो. त्यामुळे उपलब्ध होतील ती सर्व रोपे घेवून लावण्यात येतात.
सन २०१६-१७ मध्ये पुणे विभागात योजने अंतर्गत सहभागी असणाऱ्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ११ शाळेमध्ये स्थानिक झाडांची रोपवाटिका बनविण्याचा निर्णय शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी चर्चा करून घेतला. रोपवाटिका तयार करण्याचा उद्देश फक्त बिया आणून लावणे व रोपे तयार करणे एवढाच नव्हता. यामध्ये विद्यार्थ्यांना झाडांची ओळख होणे, फुलांची, फळांची व बियांची ओळख होणे, बिया संकलन करणे त्यांची साठवणूक पद्धती समजावून घेणे, शास्त्रीय पद्धतीने बिया पिशव्यामध्ये लावणे, बियांच्या उगवण क्षमतेचा अभ्यास करणे, रोपांच्या वाढीचा अभ्यास करणे अशा टप्प्यांचा समावेश होता.
रोपवाटिकेची सुरुवात बिया गोळा करण्यापासून झाली. यामध्ये मागच्या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडांच्या बिया संकलित केल्या. उन्हाळ्यात संकलित केलेल्या बिया जून – जुलैपर्यंत टिकवायच्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बिया राखेत ठेवल्या व त्यामध्ये कडूलिंबाचा पाला घातला. यानंतर विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यात शास्त्रीय पद्धतीने पिशव्या भरून त्यामध्ये बिया लावल्या. यामध्ये माती व खत किती घ्यायचे, पिशवी किती भरायची, बिया किती खोलीवर लावायच्या याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी बिया पिशवीमध्ये लावल्या. बिया पिशवीत लावून विद्यार्थ्यांची जबाबदारी संपली नाही. बी लावल्यापासून ती किती दिवसात उगवून येते याची नोंद प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली. लावलेल्या बियापैकी किती बिया उगवल्या याच्या आधारावर बियांची उगवण क्षमता समजावून घेतली.
पुणे विभागातील ११ शाळेतील रोपवाटिकेमध्ये विद्यार्थ्यांनी ४२ वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक झाडांच्या बिया वापरून रोपवाटिका तयार केली. योजने अंतर्गत शाळामध्ये १०८४९ बिया लावण्यात आल्या होत्या. लावलेल्या १०८४५९ बियापैकी ५५१२ बिया उगवून आल्या. ५५१२ रोपांपैकी १९८० (३६%) रोपे शाळेत येणारे पाहुणे, ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना देण्यात आली तर काही शाळेच्या परिसरात लावण्यात आली. तर १९३७ (३५%) रोपे उगवून आल्यानंतर पुरेसे संरक्षण नसल्यामुळे तर यातील काही रोपे उगवून आल्यानंतर पाण्याअभावी जळून गेली. उर्वरित १५९५ (२९%) रोपे उन्हाळ्यातही विद्यार्थी व शिक्षक जोपासत आहेत.
रोपवाटिका उपक्रम फक्त रोपे बनविण्यापर्यंत मर्यादित राहिला नाही यामध्ये विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान, भूगोल या विषयाचा हि अभ्यास केला. एका शिक्षकांनी रोपवाटिका उपक्रम इंग्रजी विषयातील एक धड्याशी जोडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितला.
शाळेमध्ये अंदाजित १००० रोपांची रोपवाटिका तयार करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु मोठ्या झालेल्या रोपांच काय करायचं हा शाळेसमोर प्रश्नच होता. शाळेमध्ये तयार झालेली रोपे ग्रामस्थांना वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण यामध्ये रोपांच्या बदल्यात पैसे न घेता (cashless) ग्रामस्थांकडून वस्तू किवा सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
उदा. करंजाचे १० झाड शाळेने ग्रामस्थांना दिल्यानंतर त्या किमतीची वस्तू किवा त्याबदल्यात श्रम गावकऱ्यानी शाळेसाठी द्यावे असे ठरवण्यात आले. पहिल्यांदा हे जरा अवघड वाटले, परंतु सालसे (ता. करमाळा) शाळेतील अनुभव प्रेरणादायी ठरला. गावातील एका संस्थेने त्यांच्या परिसरामध्ये लावण्यासाठी ४० रोपे शाळेच्या रोपवाटिकेतून घेतली. या रोपाच्या बदल्यात पैसे न घेण्याची भूमिका शिक्षकांनी घेतली. याचबरोबर शिक्षकांनी पैसे न घेण्याची भूमिका हि समजावून सांगितली व शाळेला उपयोगी अशी वस्तू देण्याची विनंती केली. शाळा पैसे घेत नाही अस ऐकणे त्यांच्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता. परंतु पुढच्याच क्षणी त्या संस्थेने स्वेच्छेने शाळेसाठी २००० लिटरची पाण्याची टाकी दिली. यामुळे रोपवाटिकेच्या व्यवहारातून पैसा काढून वस्तू स्वरुपात व्यवहार केल्यामुळे पारदर्शकता आली व शाळा, गाव व इतर संस्थेमध्ये जिव्हाळ्याचे वातावरण तयार होत आहे. .
रोपवाटिका हा शाळेचा फक्त एक उपक्रम न राहता, यातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील झाडांची ओळख करून घेतली. बी पासून रोप होण्याचा प्रवास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि फक्त पुस्तकात न वाचता तर प्रत्यक्ष कृतीतून वैज्ञानिक दृष्ट्या बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या.
अशाप्रकारे पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून शाळा व गाव पातळीवर रोपवाटिका उपक्रम जोरदारपणे राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक शिक्षकांबरोबर ग्रामस्थ हि करत आहेत.
महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना माध्यमिक शाळेमध्ये राबविली जाते. सदर योजनेसाठी राज्य सनियंत्रण संस्था म्हणून पर्यावरण शिक्षण केंद्र काम पाहते. पर्यावरण सेवा योजनेमध्ये प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. बहुतेक वेळा शासकीय योजना म्हणजे अतिरिक्त जबाबदारी असा समज होतो. परंतु पर्यावरण सेवा योजनेमध्ये पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमातील इतर विषयांशी जोडून कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवला जातो. योजने अंतर्गत पाणी, उर्जा, घनकचरा, जैवविविधता व संस्कृती आणि वारसा या विषयवार काम केले जाते. योजनेचा मुख्य उद्देश हा स्थानिक पर्यावरण समस्या शोधून त्या लोकसहभागातून सोडवणे, भविष्यात पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदार नागरिक तयार करणे असा आहे.

गणेश सातव
विभाग समन्वयक,
पर्यावरण सेवा योजना (महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग पुरस्कृत)
पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे