नाशिक विभाग
उपक्रम क्रमांक-१५ उपक्रमाचे नाव- परिससरात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या नोंदी घेणे कोविड-१९ च्या कालावधीत आपण सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबवित आहोत त्यानुसार विद्यार्थ्यांनी घराच्या आसपास आढळणाऱ्या फुलपाखरांच्या नोंदी घेतल्या आहेत. घराच्या आसपास आढळणारे फुलपाखरू बाबत निरीक्षण करून खालील दिलेल्या ई-बुक (पीडीएफ) बुक वरून परिसरात आढळणाऱ्या फुलपाखरू प्रजातींच्या नोंदी खालील पाठवलेल्या फॉरमॅट मध्ये विद्यार्थ्यांनी नोंदाल्या आहेत व फोटो ग्रुप वर पाठवले आहे. Butterfly e-book by Dr.Raju kasambe,BNHS Mumbai https://www.researchgate.net/publication/326098762_Butterflies_of_Western_Ghats_Second_Edition_2018_-3_Finalस्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
Friday, 5 March 2021
नाशिक विभाग- परिसरात आढळणारे पक्षी निरीक्षण नोंदी
नाशिक विभाग
उपक्रम क्रमांक-१४ उपक्रमाचे नाव- जैववीविधता नोंदवही तयार करणे कोविड-१९ च्या कालावधीत आपण सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबवित आहोत त्यानुसार आपल्या घराच्या आसपास असलेल्या जैवविवीधता नोंदी करायच्या आहेत. परिसरात आढळणारे पक्षी निरीक्षण नोंदी बाबत विद्यार्थ्यांना तक्ता देण्यात आला, त्यानुसार विद्यार्थ्यानी पक्षी निरीक्षण केले आहे. सोबत एक पी डी एफ ई-बुक डॉ. राजू कसंबे, बी.एन एच.एस मुंबई यांनी तयार केलेले आहे. त्याचाा आधार घेऊन. यामध्ये १०० कॉमनली आढळणारे बर्डस् चे फोटोस आणि माहिती विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलीे होती . पुस्तकाचे वाचन करून, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात यापैकी कोणते बर्डस आढळतात याबाबत नोंदी घेऊन माहिती पाठवली आहे. Dr.Raju Kasambe https://www.researchgate.net/publication/343218657_100_Common_Birds_in_IndiaTuesday, 19 January 2021
नाशिक विभाग- उपक्रमाचे नाव- विद्युत मीटर वाचन अभ्यास
उपक्रम क्रमांक-१२
उपक्रमाचे नाव- विद्युत मीटर वाचन अभ्यास
कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत. कुटुंबाचे विद्युत मीटर वाचन अभ्यास करून खालील माहिती पत्रकामधील माहितीचे वाचन करून माहिती भरून पाठवली आहे.Friday, 1 January 2021
उपक्रमाचे नाव- प्लॅस्टिक अभ्यास व प्रश्नावली
नाशिक विभाग
उपक्रम क्रमांक-११
Thursday, 17 December 2020
छोटे संशोधक संकलित करत आहेत गावनिहाय पक्षांविषयी अमुल्य
अशी माहिती
पर्यावरण
सेवा योजने अंतर्गत करमाळा तालुक्यातील कार्यरत असणाऱ्या शाळा गेल्या तीन
वर्षापासून पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शाळेपासून दोन किमीचे
अंतर निश्चित करून या परिसरातील पक्षांचे
विद्यार्थी निरीक्षण करत आहेत. हा दोन किमीचे अंतर ठरविताना सदर रस्ता
गावातून, शेतातून जावून एखाद्या पाणथळी जागेपर्यंत जाता येईल असा रस्ता
जाणीवपूर्वक निवडला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांना शेती परीसंस्थेमधील, पाणथळ
परीसंस्थेमधील व तसेच मनुष्य वस्तीजवळ असणारे पक्षी निरीक्षण करण्याची संधी मिळेल.
या
पक्षी निरीक्षणाच्या आधारे गाव परिसरात आढळणाऱ्या पक्षांची यादी निश्चित करण्याचे
काम योजने अंतर्गत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे जैवविविधते मधील
अतिशय महत्त्वाच्या घटकाची नोंद गाव पातळीवर करण्यात येईल.
परंतु
पक्षी निरीक्षणाचा उपक्रम फक्त निरीक्षणा पुरता मर्यादित न ठेवता याचा शास्त्रीय व
सविस्तर अभ्यास करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. यासाठी विद्यार्थी त्यांनी
केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी त्यांच्या वहीत ठेवत आहेत. याचबरोबर ऋतूमनानुसार
पक्षांचा आढळ कसा बदलत आहे याचाही अभ्यास विद्यार्थी करत आहेत.
याचबरोबर
स्थलांतरित पक्षांच्या नोंदी विद्यार्थी सविस्तरपणे ठेवत आहेत. ज्यामुळे भविष्यात
संबधित परिसरातील स्थलांतरित पक्षांचे आगमन, संख्या व अधिवास याबाबत अभ्यास
करण्यास महत्त्वाची माहिती मिळेल.
आतापर्यंत
आपल्या भारतात पक्षी विज्ञानात काम करणाऱ्या तज्ञांनी त्यांचा भर हा प्रामुख्याने
नोंदीवरच ठेवलेला होता. याच नोंदीच्या आधारे ते ठोस निष्कर्षापर्यंत पोहचू शकले
आहेत.
गावपातळीवर
काम करणारे हे संशोधक त्यांच्या गावासाठी जी अमूल्य अशी पक्षांविषयी माहिती संकलित
करत आहेत ती भविष्यात सर्वांसाठीच खूप उपयुक्त ठरणार आहे.
गणेश सातव,
पुणे विभाग समन्वयक,
पर्यावरण सेवा योजना 
विद्यार्थ्यांनी महिना निहाय पक्षांच्या ठेवलेल्या नोंदी
![]() |
| विद्यार्थ्यांनी स्थलांतरित पक्षांच्या ठेवलेल्या नोंदी |
Wednesday, 16 December 2020
नाशिक विभाग- जीवामृत तयार करणे
उपक्रम क्रमांक-०९
उपक्रम पूर्ण करण्याचा कालावधी- दिनांक २३-११-२०२० ते २८-११-२०२०






































