स्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
Tuesday, 20 February 2018
क.भा.पा.विद्यालय आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक- दोन दिवसीय अनिवासी शिबीर
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन
पर्यावरण सेवा अंतर्गत क.भा.पा.विद्यालय आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक येथे दिनांक ०५-०२-२०१८ आणि ०६-०२-२०१८ या दोन दिवसीय अनिवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते,
विषय- घणकचरा वर्गीकरण ,विल्हेवाट व जनजागृती
प्राचार्य मा.श्री सोमवंशी एस.डी .
योजना प्रमुख श्री ठाकरे जे .एन .,
सरपंच व ग्रामसेवक यांची मुलाखत विद्यार्थ्या मार्फत घेण्यात आली,विद्यार्थी घरात जाऊन घनकचरा विषयी जनजागृती केली,व प्रायोगीक तत्वावर ५० कुटुंबाना ओला कचरा व सुखा कचरा यांच्यासाठी दोन डस्टबिन भेट देण्यात आल्या.. गावातील घनकचरा व्यावास्थापानेबाबत नकाशा तयार करण्यात आला. पर्यावरण व एकाग्रता या विषयी गेम घेण्यात आला
; महिला बैठक,घनकचरा वर्गीकरण विषयी खेळ घेण्यात आला,कापडी पिशवी वाटप करण्यात आली.
आसखेडा गावात घेतलेल्या घनकचरा शिबिराचा *सकारात्मक प्रभाव* असा झाला की, सरपंच श्रीमती.जयाताई सावळा यांनी २ शिलाई मशीन एक वैयक्तिक त्यांच्या कडून आणि एक ग्रामपंचायत मार्फत शाळेला भेट देण्याचे जाहीर केले आहे..

वाटर ऑडीट आणि नळ बदली-जनता विद्यालय टेंभे(वरचे) ता.बागलाण जि.नाशिक
कृती १- वाटर ऑडिट
शाळेतील एकूण ०६ नळांपैकी ०४ गळक्या नळांचे वाटर ऑडीट करण्यात आले त्यामध्ये ०४ गळक्या नळाद्वारे एकूण ७८१,०२७ लिटर
एकूण २३५ शैक्षणिक कामाच्या
![]() |
| वॉटर ऑडिट करतांना विद्यार्थी |
![]() |
| पाण्याचे गळके नळ(पूर्वीची स्थिती) |
![]() |
| बदललेले नळ (आत्ताची स्थिती) |
यावर तोडगा विद्यार्थी,मुख्याध्यापक आणि शिक्षक सह नळ बदलावयाचा निर्णय घेण्यात आला.
कृती-दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी एकूण ०६ नळ बदलवण्यात आले.
नळ बदलावतांना विशेष काळजी घेतली की बऱ्याच वेळा फिरवणारे नळ जर उघडे राहिले तर पाणी जास्त वाया जाऊ शकते,त्यामुळे जे नळ दाबून (प्रेस) करणारे आहेत,ते बसवण्यात आले जेणेकरून पाणी कमी वाया जाईल.
शिकवणूक
१.विद्यार्थ्यांना नळ गळती द्वारे सदर समस्येची गंभीरता जेव्हा लक्षात आली की तुलना केली की आपण किती टँकर पाणी आतापर्यंत वाया घालवले आणि याचा परिणाम मार्च ते मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते.आणि पाण्याचा काटकसरीने वापर हा निर्णय घेतला.
गांडूळ खत प्रकल्प-माध्यमिक विद्यालय पळसे ता.जि. नाशिक
पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत गांडूळ खत प्रकल्प
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय पळसे ता.जि. नाशिक
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत शाळेमध्ये गांडूळ खत प्रकल्प साकारला आहे.
रचना-
१) २०× ७ फूट आयताकृती बांधकाम करून स्ट्रक्चर तयार केले आहे.
त्यामध्ये पालापाचोळा, माती आणि शेण याचे आवरण टाकले आहे.
२) बारदाण पोत्याचे आवरण टाकले आहे आणि पाणी मारले जाते गांडूळासाठी थंडावा महत्वाचा असतो.
३) बाजूला वर्मी वॉश जाण्यासाठी पाईप आणि खड्डा केला आहे.
४) सदर प्रकल्प मध्ये २ की.ग्राम Eisenia fetida प्रजातीचे गांडूळ सोडण्यात आले आहे.
५) गांडूळ स्ट्रक्चर ला हिरवे नेट बांधले आहे
६) साधारण ४० ते ४५ दिवसानंतर गांडूळ खत तयार झाले.
सदर प्रकल्पास मुख्याध्यापक श्री. पिंगळे एस.टी आणि योजनाप्रमुख श्री.पगार ए. वाय
तसेच इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले

| गांडूळ बेड |
![]() |
| गांडूळ |
![]() |
| गांडूळ सोडतांना विद्यार्थी आणि शिक्षक |
![]() |
| तयार झालेले गांडूळ खत काढतांना विद्यार्थी |
Subscribe to:
Posts (Atom)