Thursday, 17 December 2020

छोटे संशोधक संकलित करत आहेत गावनिहाय पक्षांविषयी अमुल्य अशी माहिती

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत करमाळा तालुक्यातील कार्यरत असणाऱ्या शाळा गेल्या तीन वर्षापासून पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबवत आहेत. यामध्ये शाळेपासून दोन किमीचे अंतर निश्चित करून या परिसरातील पक्षांचे  विद्यार्थी निरीक्षण करत आहेत. हा दोन किमीचे अंतर ठरविताना सदर रस्ता गावातून, शेतातून जावून एखाद्या पाणथळी जागेपर्यंत जाता येईल असा रस्ता जाणीवपूर्वक निवडला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांना शेती परीसंस्थेमधील, पाणथळ परीसंस्थेमधील व तसेच मनुष्य वस्तीजवळ असणारे पक्षी निरीक्षण करण्याची संधी मिळेल.

या पक्षी निरीक्षणाच्या आधारे गाव परिसरात आढळणाऱ्या पक्षांची यादी निश्चित करण्याचे काम योजने अंतर्गत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे जैवविविधते मधील अतिशय महत्त्वाच्या घटकाची नोंद गाव पातळीवर करण्यात येईल.

परंतु पक्षी निरीक्षणाचा उपक्रम फक्त निरीक्षणा पुरता मर्यादित न ठेवता याचा शास्त्रीय व सविस्तर अभ्यास करण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत आहेत. यासाठी विद्यार्थी त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी त्यांच्या वहीत ठेवत आहेत. याचबरोबर ऋतूमनानुसार पक्षांचा आढळ कसा बदलत आहे याचाही अभ्यास विद्यार्थी करत आहेत.

याचबरोबर स्थलांतरित पक्षांच्या नोंदी विद्यार्थी सविस्तरपणे ठेवत आहेत. ज्यामुळे भविष्यात संबधित परिसरातील स्थलांतरित पक्षांचे आगमन, संख्या व अधिवास याबाबत अभ्यास करण्यास महत्त्वाची माहिती मिळेल.

आतापर्यंत आपल्या भारतात पक्षी विज्ञानात काम करणाऱ्या तज्ञांनी त्यांचा भर हा प्रामुख्याने नोंदीवरच ठेवलेला होता. याच नोंदीच्या आधारे ते ठोस निष्कर्षापर्यंत पोहचू शकले आहेत.

गावपातळीवर काम करणारे हे संशोधक त्यांच्या गावासाठी जी अमूल्य अशी पक्षांविषयी माहिती संकलित करत आहेत ती भविष्यात सर्वांसाठीच खूप उपयुक्त ठरणार आहे.

 

गणेश सातव,

पुणे विभाग समन्वयक,

पर्यावरण सेवा योजना     

विद्यार्थ्यांनी महिना निहाय पक्षांच्या ठेवलेल्या नोंदी 




विद्यार्थ्यांनी स्थलांतरित पक्षांच्या ठेवलेल्या नोंदी

Wednesday, 16 December 2020

नाशिक विभाग- जीवामृत तयार करणे

उपक्रम क्रमांक-०९

उपक्रम पूर्ण करण्याचा कालावधी- दिनांक २३-११-२०२० ते २८-११-२०२०

उपक्रमाचे नाव- जीवामृत तयार करणे
कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत. घरगुती पातळीवर निघणाऱ्या कुजणाऱ्या कचऱ्याचे उत्तम गुणवत्तेचे खत तयार करण्यासाठी जीवामृत तयार करण्याची प्रक्रिया बाबत माहिती पत्रकात विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली..
जीवामृत २ ते ५ लिटर या प्रमाणात तयार करण्यात आले. माहिती पत्रकात ५० ते १०० लिटर चे प्रमाण दिले आहे, ते मोठ्या प्रमाणात ज्या वेळेस उपयोग करावयाचा असेल त्या वेळेला तयार करता येईल
उदा.५ लिटर पाणी, १ किलो शेण,१ लिटर गोमित्र, १०० ग्राम गूळ, १०० ग्राम बेसन पीठ, १०० ग्राम दही हे सर्व मिश्रण एकत्र करावे.
व कुजणाऱ्या कचऱ्यावर त्याचा उपयोग केला तर त्यापासून जलद गतीने व उत्तम गुणवत्तेचे कंपोस्ट खत तयार होईल.





नाशिक विभाग-घनकचरा व्यवस्थापन प्रश्नावली

उपक्रम क्रमांक-०८

उपक्रमाचे नाव-घनकचरा व्यवस्थापन प्रश्नावली
कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत. विद्यार्थ्यांचे व्हाटस अप ग्रुप तयार आहेत, त्यानुसार विद्यार्थ्यांनी सर्व माहिती ग्रुप वर पाठवली आहे. घरगुती पातळीवर निघणाऱ्या कचऱ्याचे निरीक्षण करून घनकचरा व्यवस्थापन सर्वेक्षणाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे.. तसेच प्रश्नावली मधील प्रश्न व उत्तरे विद्यार्थ्यांनी पर्यावरण सेवा योजनेच्या नोंदवहीत नोंदवले आहेते व त्याचे फोटो ग्रुप वर शेयर केले आहेत.

















नाशिक विभाग- उपक्रमाचे नाव-घनकचरा ऑडिट

 नाशिक विभाग

उपक्रम क्रमांक- ०७

घनकचरा ऑडीट

कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रम घरगुती पातळीवर राबविले आहेत. विद्यार्थ्यांनी घरगुती पातळीवर निघणाऱ्या कचऱ्याचे ऑडिट केले आहे.

साहित्य- कचरा पेटी, गोणी (पोते) नोंदवही इ.
                      












\\