Tuesday, 29 April 2014

पर्यावरण सेवा योजना कार्यशाळा नाशिक जिल्हा

पर्यावरण सेवा योजनेत नवीन शाळा निवड प्रक्रियेसाठी कार्यशाळा नाशिक
                                                                                                                        दिनांक-२६-०४-२०१४
स्थळ- वैनतेय महाविद्यालय,निफाड,ता.निफाड,जि.नाशिक, वेळ- सकाळी-१० वा.
मार्गदर्शक- श्री.जगदीश ठाकूर (जिल्हा समन्वयक-नाशिक विभाग)
महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनेसाठी नवीन शाळा निवड प्रक्रियेसाठी नाशिक जिल्ह्यासाठी निफाड येथे कार्यशाळा आयोजित  करण्यात आली.

            सर्वप्रथम सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली,शिक्षकांनी आपला परिचय बाबत विचारणा करण्यात आली,त्यानंतर शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेचे सादरीकरण देण्यात आले,त्यामध्ये प्रस्तावना,उद्देश,उपक्रमांची यादी,शाळा निवडीचे निकष,निधी व मानधन यासारखे मुद्दे समजून सांगण्यात आले,शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेचे नमुना अर्ज,प्रपत्र १ व २ देण्यात आले व अर्ज पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे येथे पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

बातमीपत्र-
·        नाशिक देशदूत दि.१६-०४-२०१४,
http://www.deshdoot.com/enewspapers.php?region=Nashik&date=1397586600&id=85550




नाशिक- देशदूत दि.२७-०४-२०१४
http://www.deshdoot.com/enewspapers.php?region=Nashik&date=1398537000&id=86428

पर्यावरण सेवा योजना कार्यशाळा जळगाव


पर्यावरण सेवा योजनेत नवीन शाळा निवड प्रक्रियेसाठी कार्यशाळा- जळगाव
                                                                                                                        दिनांक-०५-०४-२०१४
स्थळ- मु.जे.महाविद्यालय जळगाव,जि.जळगाव, वेळ- सकाळी-११ वा.
मार्गदर्शक- श्री.जगदीश ठाकूर (जिल्हा समन्वयक-नाशिक विभाग),श्री.जोएब दाऊदी(जिल्हा समन्वयक-औरंगाबाद विभाग)
महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनेसाठी नवीन शाळा निवड प्रक्रियेसाठी जळगाव  येथे कार्यशाळा आयोजित  करण्यात आली.
            सर्वप्रथम सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली,शिक्षकांनी आपला परिचय व यापूर्वी पर्यावरणपूरक केलेले काम व अनुभव याबाबत विचारणा करण्यात आली,त्यानंतर शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेचे सादरीकरण देण्यात आले,त्यामध्ये प्रस्तावना,उद्देश,उपक्रमांची यादी,शाळा निवडीचे निकष,निधी व मानधन यासारखे मुद्दे समजून सांगण्यात आले,शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेचे नमुना अर्ज,प्रपत्र १ व २ देण्यात आले व अर्ज पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे येथे पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

जळगाव येथे कार्याशाळा मार्गदर्शन करतांना नाशिक विभागाचे जिल्हा समन्वयक.
सकाळ जळगाव आवृत्ती दि-२६-०३-२०१४

Thursday, 24 April 2014

Name of News Paper :- Lokmat
Date:- 11-4-2014

Name of News Paper:- Hitavada (vidarbha Line)
Date:- 7-4-2014

Tuesday, 22 April 2014


पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पुणे विभागात राबविलेल्या उपक्रमांची बातमी दै. लोकमतने 16/04/2014 रोजी प्रकाशित केली आहे.

Tuesday, 8 April 2014

        कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशाला,पुणे येथील विद्यार्थिनी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करताना




बाजारात मिळणाऱ्या रंगामध्ये वेगवेगळी रसायने वापरलेली असतात. त्यामुळे त्वचा खराब होणे, डोळ्यांना इजा होणे, केसावर परिणाम होणे या गोष्टी घडतात. तसे होवू नये म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी आनंदात साजरी करण्याची राठी प्रशालेच्या विद्यार्थिनीनी ठरविले.
विद्यार्थिनीनी खालील प्रमाणे नैसर्गिक रंग तयार केले.
·       हिरवा रंग – विद्यार्थिनीनी पालक, कोथिंबीर व गुलमोहराच्या वाळलेल्या पानापासून हिरवा रंग बनविला.
·       पिवळा रंग  - दोन चमचे हळद व चार चमचे बेसन पीठ एकत्र करून पिवळा रंग (कोरडा) बनविला, तसेच झेंडूची फुले पाण्यात उकळून ओला पिवळा रंग बनविला.
·       लाल रंग – लाल फुले वाळवून कोणत्याही पिठात मिसळल्यास कोरडा लाल रंग तर लाल डाळींबापासून ओला लाल रंग तयार केला.
·       किरमिजी रंग – बीट किसून एक लिटर पाण्यात मिसळणे ते मिश्रण उकळून रात्रभर तसेच ठेवल्यास किरमिजी रंग तयार होतो.
·       केशरी रंग – पळसाची फुले वळवून पूड केल्यास कोरडा केशरी रंग मिळतो, पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजवून किंवा उकल्यास सुगंधी केशरी रंग मिळतो.
·       काळा रंग – वाळलेल्या आवळ्याची फळे लोखंडाच्या भांड्यात उकळा आणि रात्रभर तशीच ठेवल्यास काळा रंग मिळतो.
·       निळा रंग – नीलमोहोरची फुले वळवून त्यापासून निळा कोरडा रंग बनविला जातो.
·       तपकिरी रंग – विड्याचे पानात वापरण्यात येणारा कात पाण्यात मिसळल्यास ओला तपकिरी रंग मिळतो.
ह   हा उपक्रम विद्यार्थिनीनी पर्यावरण सेवा योजना गटापुरता मर्यादित न ठेवता, याबाबतची माहिती प्रशालेतील इतर   विद्यार्थीनीना दिली व पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले.

सदर उपक्रम राबविण्याकरिता पर्यावरण सेवा योजनेच्या योजना प्रमुख सौ. स्मिता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन विद्यार्थीनीना मिळाले. सदर अहवाल योजना प्रमुखांनी तयार करून पर्यावरण शिक्षण केंद्रास सादर केला आहे.