कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशाला,पुणे येथील विद्यार्थिनी पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करताना
बाजारात मिळणाऱ्या रंगामध्ये वेगवेगळी रसायने वापरलेली असतात. त्यामुळे त्वचा
खराब होणे, डोळ्यांना इजा होणे, केसावर परिणाम होणे या गोष्टी घडतात. तसे होवू नये
म्हणून दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी आनंदात साजरी करण्याची राठी प्रशालेच्या विद्यार्थिनीनी ठरविले.
विद्यार्थिनीनी खालील प्रमाणे नैसर्गिक रंग तयार केले.
· हिरवा रंग –
विद्यार्थिनीनी पालक, कोथिंबीर व गुलमोहराच्या वाळलेल्या पानापासून हिरवा रंग
बनविला.
· पिवळा रंग - दोन चमचे हळद व चार चमचे बेसन पीठ एकत्र करून
पिवळा रंग (कोरडा) बनविला, तसेच झेंडूची फुले पाण्यात उकळून ओला पिवळा रंग बनविला.
· लाल रंग – लाल
फुले वाळवून कोणत्याही पिठात मिसळल्यास कोरडा लाल रंग तर लाल डाळींबापासून ओला लाल
रंग तयार केला.
· किरमिजी रंग – बीट किसून एक लिटर पाण्यात मिसळणे ते मिश्रण उकळून रात्रभर तसेच ठेवल्यास
किरमिजी रंग तयार होतो.
· केशरी रंग –
पळसाची फुले वळवून पूड केल्यास कोरडा केशरी रंग मिळतो, पळसाची फुले रात्रभर
पाण्यात भिजवून किंवा उकल्यास सुगंधी केशरी रंग मिळतो.
· काळा रंग –
वाळलेल्या आवळ्याची फळे लोखंडाच्या भांड्यात उकळा आणि रात्रभर तशीच ठेवल्यास काळा
रंग मिळतो.
· निळा रंग –
नीलमोहोरची फुले वळवून त्यापासून निळा कोरडा रंग बनविला जातो.
· तपकिरी रंग –
विड्याचे पानात वापरण्यात येणारा कात पाण्यात मिसळल्यास ओला तपकिरी रंग मिळतो.
ह हा उपक्रम विद्यार्थिनीनी पर्यावरण सेवा योजना गटापुरता मर्यादित न ठेवता, याबाबतची माहिती प्रशालेतील इतर विद्यार्थीनीना दिली व पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले.
सदर उपक्रम राबविण्याकरिता पर्यावरण सेवा योजनेच्या योजना प्रमुख सौ. स्मिता
कुलकर्णी यांचे मार्गदर्शन विद्यार्थीनीना मिळाले. सदर अहवाल योजना प्रमुखांनी तयार
करून पर्यावरण शिक्षण केंद्रास सादर केला आहे.
No comments:
Post a Comment