Wednesday, 7 May 2014

नवीन शाळा निवड प्रक्रियेसाठी कार्यशाळा
                                                                                  
दिनांक-२५-०४-२०१४ 

स्थळ- राजापूर हायस्कूल, राजापूर.

वेळ- सकाळी-११ वा.


मार्गदर्शक- श्री. दिनेश वाघमारे (जिल्हा समन्वयक- कोंकण विभाग),

                  श्री. गणेश सातव (जिल्हा समन्वयक- पुणे विभाग)

पर्यावरण सेवा योजने अंतर्गत सन २०१४-२०१५ साठी नवीन शाळा निवड प्रक्रिया अंतर्गत योजनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १५ शाळांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले होते. जिल्हा समन्वयकांच्या विनंतीनुसार राजापूर विज्ञान मंडळ यांचे अध्यक्ष श्री. गुरव सर यांनी विज्ञान मंडळातील शिक्षकांना फोनवरून संपर्क साधून कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी श्री. अहिरे सर यांच्याशी नवीन शाळा निवड प्रक्रियेबाबत माहिती देण्याकरिता संपर्क साधण्यात आला. दिनांक २४-०४-२०१४ रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या राजापूर व लांजा तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत योजनेबद्दलची माहिती तसेच नियोजित कार्यशाळेस सर्व शाळेच्या प्रतिनिधीना उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन करण्याचे श्री. अहिरे सर यांना राज्य समन्वयक सौ. सुप्रिया निशानदार मॅडम यांनी विनंती केली. कार्यशाळेला एकूण राजापूर तालुक्यातील १३ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. 

सर्वप्रथम सर्व शिक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली,शिक्षकांनी आपला परिचय व यापूर्वी पर्यावरणपूरक केलेले काम व अनुभव याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर उपस्थितीतांना “पर्यावरण सेवा योजने” बद्दलची माहिती सादर केली,त्यामध्ये प्रस्तावना,उद्देश,उपक्रमांची यादी,शाळा निवडीचे निकष,निधी व मानधन यासारखे मुद्दे समजून सांगण्यात आले. उपस्थित शिक्षकांना योजनेबाबत विचारलेल्या शंकाचे निरसन जिल्हा समन्वयकांनी केले. शिक्षकांना पर्यावरण सेवा योजनेचे नमुना अर्ज,प्रपत्र १ व २ देण्यात आले. सदर पूर्ण भरलेले अर्ज पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे येथे पाठविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

उपस्थित शिक्षकांना माहिती सादर करताना जिल्हा समन्वयक.
उपस्थित शिक्षकांना माहिती सादर करताना जिल्हा समन्वयक

No comments:

Post a Comment