Tuesday, 7 August 2018

अवर सचिव, पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी घेतला पर्यावरण सेवा योजनेतील शाळेंचा आढावा.

 
 पर्यावरण विभाग पुरस्कृत, पर्यावरण सेवा योजना अंतर्गत,
यु.एन.इ.पी (United Nations Environment Program)  ने २०१८ ला ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी  साठी ‘Beat Plastic Pollution’ या विषयांतर्गत भारताला यजमानपद मिळाले असून त्याबाबत संपूर्ण जगाला प्रतिनिधित्व केले आहे,याच अनुषंगाने मा.अवर सचिव, श्री. संजयजी संदनशिवे, पर्यावरण विभाग,महाराष्ट्र शासन यांनी आदर्श विद्यालय वरोडा, पो. ब्राम्हणी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर या शाळेला दि.१७ जुलै २०१८ रोजी विशेष भेट देऊन नागपूर आणि अमरावती विभागातील शिक्षकांसाठी प्लॅस्टिक मुक्त शाळा व गाव परिसर या विषयांतर्गत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन मा. अवर सचिवांच्या हस्ते सरस्वतीच्या मूर्तीची पूजा व दीप प्रज्वलन करून झाले.यामध्ये लोकसमुदायाबरोबर काम करताना प्लॅस्टिक कचरा आणि त्याचे धोके,त्याचे व्यवस्थापन आणि विल्लेवाट,प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाची भूमिका,शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय (जी.आर) तसेच कोणकोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या आणि वस्तूंवर बंदी आहे याबाबत सविस्तर माहिती दिली.प्लॅस्टिक बंदी हि जोपर्यंत लोकचळवळ होत नाही तोपर्यंत प्लॅस्टिक बंदी शक्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीचा महाराष्ट्र शासनाचे प्लॅस्टिक बंदी विषयी माहिती साठी पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे मार्फत तयार केलेली प्लॅस्टिक विषयक हस्तपुस्तिका योजना प्रमुखांना देण्यात आले.
            पर्यावरण सेवा योजनेला सात वर्ष पूर्ण झाले असून सद्यस्थितीला संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरण सेवा योजनेतील शाळा व गाव परिसरात विविध नाविन्यपूर्ण कृती उपक्रम राबविण्यात आले आहे. सदर उपक्रमांची दखल घेत श्री. संजयजी संदनशिवे यांनी योजनेच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आदर्श मानकर विद्यालयास या शाळेला भेट देवून योजने अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला.विद्यार्थ्यांनी गट निहाय मा. अवर सचिवांसमोर सादरीकरण केले. प्रथम विद्यार्थी गटाने पर्जन्यमापक यंत्र,पर्जन्य नोंदी, सर्वात जास्त आणि कमी पडलेला पाऊस याबाबत माहिती दिली.पर्जन्यमापकाच्या विविध भागाची शास्त्रीय माहिती ऐकून मा. अवर सचिवांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दुसऱ्या गटाने निर्माल्यापासून खत तयार करणे गणेश मंडळाकडून निर्माल्या संकलन, तिसऱ्या गटाने शाळा परिसरात तयार केलेल्या रोपवाटिकेबाबत विद्यार्थ्यांनी बीज संकलन, बीज साठवणूक, बीज प्रक्रिया,उगवण क्षमता अभ्यासणे, नोंदी याबाबत सादरीकरण केले.चौथ्या गटाने शाळा परिसरात गांडूळ खत प्रकल्प सादरीकरण केले, यामध्ये गांडूळ खताच्या बेडबाबत शेण व पालापाचोळ्याचा थर,कोणत्या जातीचे गांडूळ वापरले आहे याबाबत सादरीकरण केले. कमी खर्चात तयार होत असलेला गांडूळ खत उपक्रम पाहून मा. अवर सचिवांनी शाळेचे व विद्यार्थ्यांची कौतुक केले. कार्यशाळेच्या ठिकाणी योजने अंतर्गत नागपूर व अमरावती विभागातील शाळांनी राबविलेल्या उपक्रमांची प्रदर्शनी भरविण्यात आली होती.माहिती मॉडेल, अहवाल, कंपोस्ट खत, टाकावू पासून टिकावू वस्तू, बीज संकलन, गाव स्तरावर राबविलेल्या उपक्रमाचे अहवाल व फोटो, शिक्षकांचे मासिक अहवाल, शाळानिहाय फाईल, माल साठा नोंदवही यांचा समावेश होता.
            नागपूर व अमरावती विभागातील निवडक ७ योजनाप्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.त्यांच्या शाळेमध्ये घेतलेल्या उपक्रमाचा अहवाल, छायाचित्र, गाव पर्यावरण सद्य स्थिती अहवाल, टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या वस्तू,उपक्रम नोंद वही पुस्तिका व मालसाठा नोंद वही, शाळा व गाव परिसरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती व टप्पे याबाबत योजना प्रमुखांनी सविस्तर माहिती अवर सचिवांना दिली. योजनेत सहभाग झाल्यापासून विद्यार्थी व शिक्षक म्हणून झालेल्या सकारात्मक बदलाबाबत माहिती दिली. गावाच्या माजी सरपंच श्रीमती.कल्पना डाखोळे यांनी योजना गाव परिसरात राबविल्यामुळे गावकऱ्यांमध्ये झालेल्या बदलाची माहिती दिली. यामध्ये अवर सचिवांनी मुख्याध्यापक, योजना प्रमुख व माजी सरपंचांशी चर्चा करून योजना शाळा व गाव स्तरावर कशा प्रकारे राबविली जाते याची माहिती घेतली.शिक्षकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या,शासन स्तारावर त्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असा विश्वास दिला. पर्यावरण सेवा योजनेचे उपक्रम अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन दिले.
            कार्यक्रमाची सांगता मा. अवर सचिवांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली.सदर कार्यशाळेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानकर यांनी कार्यशाळा आयोजित करून सहकार्य केले. योजना प्रमुख श्रीमती. अनिता तोमर यांनी कार्यशाळेचे व्यवस्थापन केले,शाळेचे सहशिक्षक,विद्यार्थांनी मोलाचे योगदान दिले,सूत्र संचालन श्री.पडोळे यांनी केले.नागपूर विभागाचे समन्वयक श्री.भिमाशंकर ढाले यांनी कार्यक्रम घडवून आणला, पुणे विभागचे समन्वयक श्री.गणेश सातव यांनी नियोजन आणि समन्वयन केले,अमरावती विभागाच्या समन्वयिका केतकी पाटील यांनी व्यवस्थापन केले.श्रीमती.अनिता तोमर यांनी आभार मानले.
  
  • पर्जन्यमापकाद्वारे पाऊस मोजण्याचा उपक्रम मा.संजय संदानशिवे अवर सचिव , पर्यावरण विभाग यांना दाखविताना विद्यार्थी,शिक्षक
मा. सचिवांना गांडूळखत प्रक्रिया सांगताना विद्यार्थी
नागपूर विभागातील शाळेच्या उपक्रम फाईल व तयार करण्यात आलेल्या वस्तू पाहताना मा. सचिव व योजना प्रमुख श्रीमती तोमर मॅडम

 
शालेय उपक्रमाविषयी माहिती देताना योजना श्री. इंगळे सर
 
नागपूर व अमरावती विभागातील शिक्षांकाना मार्गदर्शन व त्याच्या योजनेविषयीच्या अडचणी समजून घेताना मा. सचिव सर
वृक्षारोपण करताना मा. अवर सचिव श्री. संजय संदनशिवे सर
           

Wednesday, 9 May 2018

नाशिक विभाग- दोन दिवसीय अनिवासी शिबीर_श्रीमती ब.गो.शानबाग विद्यालय,सावखेडा ता.जि.जळगाव



शाळेचे नाव- श्रीमती ब.गो.शानबाग विद्यालय,सावखेडा ता.जि.जळगाव
शिबिराचा मुख्य विषय- घनकचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापन
दिनांक- ०५-०३-२०१८ आणि ०६-०३-२०१८
शिबिराचे गाव-वैजनाथ ता.एरंडोल जि.जळगाव
पहिला दिवस:- ०५-०३-२०१८
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजने अंतर्गत शाळा आणि समुदाय पातळीवर दोन दिवसीय अनिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराला ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला,सकाळी ठीक १० वा. शिबिराला सुरुवात झाली,हजेरी घेण्यात आली.शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी श्री.विठ्ठल श्रावण गायकवाड,उपसरपंच श्री.नाना नवल पाटील,ग्रामपंचायत सदस्य, योजनाप्रमुख श्री जितेंद्र पाटील आणि श्री.बडगुजर,,प्रकल्प अधिकारी जगदीश ठाकूर नाशिक विभाग हे उपस्थित होते.
            नाशिक विभागाचे विभाग समन्वयक जगदीश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना शिबिराचा उद्देश आणि रूपरेषा समजावून सांगितली,विद्यार्थ्यांचे गट पाडून देण्यात आले,विद्यार्थी हे ग्रामपंचायत कार्यालय जवळ एकत्र जमले त्यानंतर वैजनाथ गावात सर्व विद्यार्थी गावामध्ये प्रभात फेरीसाठी गावाकडे रवाना झाले.प्रभातफेरी द्वारे गावात जनागृती हा उद्देश होता.कचरा वर्गीकरण बाबत (स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे; कचरा कुंडिचा वापर करू,सुंदर परिसर निर्माण करू; स्वच्छ घर, सुंदर परिसर,कचरा कुंडीचा करुया वापर; स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर;ई कचरा आरोग्यास खतरा; कुजणारा आणि न कुजणारा कचरा वेगळा करा, निसर्गाच्या नियमांचे पालन करा इ) घोषणा देण्यात आल्या,घोषणा फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट व्हावे कुटुंबाना कुजणारा आणि न-कुजणारा कचरा वर्गीकरण व्हावा यासाठी प्रत्येकी २ खोके असे एकूण ५० खोके कुटुंबाना वाटप करण्यात आले.गावातील कचरा टाकण्याचे ठिकाणे-उकिरडे,कचरा डेपो या बाबत गावाचा कचरा संदर्भात नकाशा काढण्यात आला.ज्यामध्ये गावातील उकिरडे,कचरा टाकण्याची ठिकाणे,विद्यार्थ्यांनी प्रश्नावली च्या सहाय्याने कचरा विल्हेवाट बाबत गावाची सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी श्री. श्री.नाना नवल पाटील यांना प्रश्न विचारले (सोबत प्रश्नावली आणि विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न उत्तर जोडले आहे) त्यामध्ये सध्या कचरा गोळा करण्यासाठी पद्धती,कचरा पेटी,कचरा टाकण्याची ठिकाणे,निधी इ.
            गावामध्ये प्रभातफेरी,जनजागृती झाल्यानंतर सर्व विद्याथी ग्रामपंचायत कार्यालय जवळ सावलीत एकत्र जमा झाले,काही काळ विश्राम झाल्यावर गावामधील महत्वाचे ठिकाणे ग्रामपंचायत फळा,महत्वाचे चौक,प्राथमिक शाळा, इ.ठिकाणे प्लॉस्टिक,ई-कचरा,कुजणारा आणि न-कुजणारा कचरा याबाबत माहितीपत्रके चिटकविण्यात आले.शाळेत परत आल्यावर विद्यार्थ्यांनी जेवण केले,त्यानंतर गावाचा नकाशा,ग्रामपंचायत प्रश्नावली आणि इतर उर्वरित कामे पूर्ण करण्यात आले.आलेले अनुभव एकमेकांना सांगितले, दुसऱ्या दिवसाचे नियोजन करण्यात आले,अश्या प्रकारे शिबिराचा पहिला दिवस पार पडला.

दुसरा दिवस- ०६-०३-२०१८
दुसऱ्या दिवशी वैजनाथ गावात विद्यार्थी सकाळी ८:०० वा. उपस्थित झाले,हजेरीघेण्यात आली,ग्रामपंचायत जवळ एकत्र झाल्यावर विद्यार्थिनिनी गावातील महिला आणि विद्यार्थ्यांनी पुरुष मंडळीना कार्यक्रमासाठी पुनश्च निमंत्रित करण्यात आले.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच श्री.विठ्ठल श्रावण गायकवाड,उपसरपंच श्री.नाना नवल पाटील,ग्रामपंचायत सदस्य,योजना प्रमुख शिक्षक,विद्यार्थीनिनी गावातील नागरिकांना  एकत्र करून कचरा आणि प्लास्टिक प्रश्न सोडवण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली.त्यामध्ये स्वच्छता या विषयी  नाटिका सादर करण्यात आली,नागरिकांना  कचरा वर्गीकरण हा विषय खेळाच्या माध्यमातून समजण्यासाठी प्रकल्प अधिकारी जगदीश ठाकूर यांनी ‘कचरा वर्गीकरण’ खेळ घेतला यामध्ये भाज्यांचे देठ,फळांचेसाल,प्लॅस्टिक,कापड,लोखंड,थर्माकॉल,ई-कचरा,जैववैद्यकीय कचरा,कागद यासारखे मिश्र कचरा टाकण्यात आला आणि त्याचे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांसोबत प्रात्यक्षिक घेण्यात आले,या माध्यमातून घरामध्ये कचरा कश्या पद्धतीने वेगळा करायचा याबाबत माहिती दिली,प्लास्टिक,इलेक्ट्रोनिक कचरा,जैववैद्यकीय या कचऱ्याची वर्गवारी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.

            सागर मित्र अभियान चे प्रतिनिधी श्री.विशाल सोनकुल  यांनी सागर मित्र अभियान बाबत माहिती दिली तसेच प्लास्टिक चे मानव आणि निसर्ग यांवर होणारे गंभीर परिणाम,समुद्रातील जलचर यांच्यावर होणारा परिणाम याबाबत गांभीर्य विद्यार्थी आणि नागरिकांना पटवून दिले,तसेच गावातील प्लास्टिक हे इतरत्र न फेकता गावामध्ये एक “सागर मित्र बॅग” ग्रामपंचायत कार्यालय जवळ लावण्यात आली, बाजाराला प्लॅस्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरावी,याचे उद्घाटन सरपंच आणि ग्रामस्त यांच्या हस्ते करण्यात आले.ज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या रॅपर्स जमा केले जाईल आणि हि प्लास्टिक बॅग भरल्यानंतर जळगाव येथील नेहा रिसायकलिंग एजन्सी ला सुपूर्त करण्यात येईल,जेणेकरून गावातील प्लास्टिक समस्या सोडवण्यास नक्कीच मदत होईल,तसेच प्लास्टिक वापर कमी आणि कापडी पिशवी जास्तीत जास्त वापरावी याबाबत आवाहान करण्यात आले.अश्या पद्धतीने दोन दिवसीय अनिवासी शिबीर पार पडले. 
गावकऱ्यासमोर स्वच्छ गाव नाटिका सादर करताना विद्यार्थी
 
घनकचरा वर्गीकरण खेळाच्या माध्यमातून समजावून सांगताना विभाग समन्वयक

वैजनाथ गावातील प्लास्टिक पिशवी संकलन साठी सागर मित्र ची  बॅॅग लावण्यात आली आहे.


Tuesday, 20 February 2018

जनता विद्यालय टेंभे(वरचे) ता.बागलाण जि. नाशिक पाणी शिबीर बातमी

जनता विद्यालय टेंभे(वरचे) ता.बागलाण जि. नाशिक
पाणी शिबीर बातमी
लोकसत्ता- नाशिक
दिनांक-१५-०२-२०१८

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक शिबीर बातमी-



कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक 
शिबीर बातमी-
सकाळ दिनांक ११-०२-२०१८

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,आसखेडा,ता.बागलाण जि. नाशिक
लोकसत्ता नाशिक - शिबीर बातमी
दिनांक-१३-०२-२०१८

क.भा.पा.विद्यालय आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक- दोन दिवसीय अनिवासी शिबीर

पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन
पर्यावरण सेवा अंतर्गत क.भा.पा.विद्यालय आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक येथे दिनांक ०५-०२-२०१८ आणि ०६-०२-२०१८ या दोन दिवसीय अनिवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते,
विषय- घणकचरा वर्गीकरण ,विल्हेवाट व जनजागृती 
प्राचार्य मा.श्री सोमवंशी एस.डी .
योजना प्रमुख श्री ठाकरे जे .एन ., 
सरपंच व ग्रामसेवक यांची मुलाखत विद्यार्थ्या मार्फत घेण्यात आली,विद्यार्थी घरात जाऊन घनकचरा विषयी जनजागृती केली,व  प्रायोगीक तत्वावर ५०  कुटुंबाना ओला कचरा व सुखा कचरा यांच्यासाठी दोन डस्टबिन भेट देण्यात आल्या.. गावातील घनकचरा व्यावास्थापानेबाबत नकाशा तयार करण्यात आला. पर्यावरण व एकाग्रता या विषयी गेम घेण्यात आला






; महिला बैठक,घनकचरा वर्गीकरण विषयी खेळ घेण्यात आला,कापडी पिशवी वाटप करण्यात आली.
आसखेडा गावात घेतलेल्या घनकचरा शिबिराचा *सकारात्मक प्रभाव* असा झाला की, सरपंच श्रीमती.जयाताई सावळा यांनी २ शिलाई मशीन एक वैयक्तिक त्यांच्या कडून आणि एक ग्रामपंचायत मार्फत शाळेला भेट देण्याचे जाहीर केले आहे..

वाटर ऑडीट आणि नळ बदली-जनता विद्यालय टेंभे(वरचे) ता.बागलाण जि.नाशिक

शाळेचे नाव- जनता विद्यालय टेंभे(वरचे) ता.बागलाण जि.नाशिक
कृती १- वाटर ऑडिट
शाळेतील एकूण ०६ नळांपैकी ०४ गळक्या नळांचे वाटर ऑडीट करण्यात आले त्यामध्ये ०४ गळक्या नळाद्वारे एकूण ७८१,०२७ लिटर
एकूण २३५ शैक्षणिक कामाच्या
वॉटर ऑडिट करतांना विद्यार्थी


पाण्याचे गळके नळ(पूर्वीची स्थिती)
बदललेले नळ (आत्ताची स्थिती)

दिवसांमध्ये वाया जाते.
यावर तोडगा विद्यार्थी,मुख्याध्यापक आणि शिक्षक सह नळ बदलावयाचा निर्णय घेण्यात आला.
कृती-दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी एकूण ०६ नळ बदलवण्यात आले.
नळ बदलावतांना विशेष काळजी घेतली की बऱ्याच वेळा फिरवणारे नळ जर उघडे राहिले तर पाणी जास्त वाया जाऊ शकते,त्यामुळे जे नळ दाबून (प्रेस) करणारे आहेत,ते बसवण्यात आले जेणेकरून पाणी कमी वाया जाईल.
शिकवणूक
१.विद्यार्थ्यांना नळ गळती द्वारे सदर समस्येची गंभीरता जेव्हा लक्षात आली की तुलना केली की आपण किती टँकर पाणी आतापर्यंत वाया घालवले आणि याचा परिणाम मार्च ते मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते.आणि पाण्याचा काटकसरीने वापर हा निर्णय घेतला.

गांडूळ खत प्रकल्प-माध्यमिक विद्यालय पळसे ता.जि. नाशिक

पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत गांडूळ खत प्रकल्प
शाळेचे नाव- माध्यमिक विद्यालय पळसे ता.जि. नाशिक
पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत शाळेमध्ये गांडूळ खत प्रकल्प साकारला आहे.
रचना- 
१) २०× ७ फूट आयताकृती बांधकाम करून स्ट्रक्चर तयार केले आहे.
त्यामध्ये पालापाचोळा, माती आणि शेण याचे आवरण टाकले आहे.
२) बारदाण पोत्याचे आवरण टाकले आहे आणि पाणी मारले जाते गांडूळासाठी थंडावा महत्वाचा असतो. 
३) बाजूला वर्मी वॉश जाण्यासाठी पाईप आणि खड्डा केला आहे.
४) सदर प्रकल्प मध्ये २ की.ग्राम 
Eisenia fetida  प्रजातीचे गांडूळ सोडण्यात आले आहे.
५) गांडूळ  स्ट्रक्चर ला हिरवे नेट बांधले आहे
६) साधारण ४० ते ४५ दिवसानंतर गांडूळ खत तयार झाले.
सदर प्रकल्पास मुख्याध्यापक श्री. पिंगळे एस.टी आणि योजनाप्रमुख श्री.पगार ए. वाय
तसेच इतर शिक्षकांचे सहकार्य लाभले

गांडूळ बेड

गांडूळ

गांडूळ सोडतांना विद्यार्थी आणि शिक्षक


तयार झालेले गांडूळ खत काढतांना विद्यार्थी
 

झाडांना गांडूळ खत देतांना विद्यार्थी,मुख्याध्यापक आणि शिक्षक

नूतन ज्ञान मंदिर अडावद ता.चोपडा जि. जळगाव निर्माल्य संकलन बातमी

दिनांक ०५ ऑक्टोबर २०१७ दैनिक पुण्य नगरी,जळगाव

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,आसखेडा ता.बागलाण जि. नाशिक


पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करणे- पळसे-नाशिक

पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना
शाळेचे नाव-माध्यमिक विद्यालय पळसे ता.जि. नाशिक
दिनांक-२४ ऑगस्ट २०१७
पर्यावरण पूरक सण- अंतर्गत शाडू माती आणि काळी मातीचा उपायोग करून गणेश मूर्ती इ.एस.एस गटाने प्रत्यक्ष कृतीतून तयार करून एक वेगळा आनंद मिळवला
कृती-१
पिंपळाच्या पानापासून गणेश प्रतिकुती तयार करण्यात अली.
कृती- २
काळ्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यात आली.यामध्ये इ.एस.एस च्या विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करून विविध आकाराचे सुबक गणेश मूर्ती तयार केली.
यामधून १ ते ४ सुबक मूर्ती तयार करणाऱ्या गटांना क्रमांक देण्यात आले.विजेत्यांना पर्यावरण पूरक माहिती असलेले पुस्तक देण्यात येणार आहे.
उद्देश हाच आहे की पर्यावरण पूरक बाबी आत्मसात व्हाव्या,विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैली अंगिकारल्या जावी.


स्व: कृतीचा आनंद आणि गुंगलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी


पिंपळ आणि गूळ भेंडी(परस पिंपळ) च्या पानापासून पर्यावरण पूरक गणेश प्रतिकृती

पिंपळाच्या पानापासून गणपती प्रतिकृती तयार करताना विद्यार्थी

तयार झालेले गणेश मूर्ती
Work is in progress

गोमुखेश्वर माध्यमिक विद्यालय,भिलवाड(मांगीतुंगी) ता.बागलाण जि-नाशिक




१)शाळेमध्ये पर्जन्य मापक बसवण्याचे प्रात्याक्षिक करण्यात आले.विद्यार्थ्यांना पर्जन्य मापक संकल्पना,पद्धती, काळजी,नोंदी घ्यावयाच्या पद्धती याविषयी माहिती देण्यात आली.
२)पर्जन्य मापकाची लेव्हल सपाट करूनच यंत्र फिक्स करणेसाठी गावातील बांधकाम मिस्तरी यांना बोलावले होते, ट्यूब लेवल च्या सहाय्याने काढून मगच पर्जन्य मापक बसवण्यात आले,विद्यार्थ्यांना याबाबत दिग्दर्शन देण्यात आले.
३)मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षकांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
४)विद्यार्थ्यांना पर्जन्य मापकाच्या नोंदी,तक्ता,स्तबालेख(आलेख),पाठ्यपुस्तक सहसंबंध याची सांगड घालण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांचे गट पाडून देण्यात आले

अर्थीयन अवॉर्ड कार्यशाळा,सटाणा जि. नाशिक

दिनांक ०५-०७-२०१७ रोजी अर्थीयन अवॉर्ड विषयी नाशिक जिल्ह्यातील ०९ शाळेंतीळ शिक्षक प्रतिनिधींसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
स्थळ -हॉटेल अवधूत ,बस स्टँड समोर सटाणा जि. नाशिक


१)कार्यशाळेचा उद्देश अर्थीयन पाणी सस्टेनेबिलिटी या विषयी
आराखड्यात दिल्या प्रमाणे Part A (Compulsory)- A1 to A5 उपक्रम आणि
Part A(Elective)
*Part B* Compulsory या सर्व उपक्रमाची उजळणी तसेच मागील वर्षी अर्थीयन राबवतांना आलेल्या अडचणी यावर जास्तीत जास्त चर्चा करण्यात आली.नाविन्यपूर्ण उपक्रम हे दिलेल्या फॉरमॅट च्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे हे निष्पन्न झाले.
२) अर्थीयन जल शाश्वतता अभियान राबवतांना काही शाळा A+ काही A तर काही B कॅटेगरी पर्यंत पोहचले होते,या वर्षी वेळ जास्त असल्याने अधिक गुणवत्तापूर्ण प्रकल्प राबवत येतील.
३)रेन गेज इन्स्ट्रुमेंट विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
पर्जन्य मापक बसवण्याची पद्धत,पाऊस मोजण्याचा कालावधी,काळजी,नोंदी,पावसाचे मोजमाप,प्रात्यक्षिक,गणितिय आकडेमोड,पाठ्यपुस्तक सहसंबंध याविषयी बिंदू जोडणे आणि माहितीचे विश्लेषण करण्यात आले.