कोविड -१९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सर्वदूर आहे. त्याचा परिणाम अध्यापन प्रक्रियेवर झाला आहे. या अनुषंगाने शासन स्तरावर ऑनलाईन ई-लर्निंग/ डिस्टन्स मोड च्या आधारे अध्यापनाची प्रक्रिया करणेबाबत विचार विनिमय सुरू होता.त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी घरगुती पातळीवर बीज संकलन केले आहे.ज्यामध्ये स्थानिक प्रजातीच्या विविध बिया संकलित केल्या आहेत.
उद्देश : कोविड-१९ साथ रोग प्रादुर्भावाच्या काळात पर्यावरण सेवा उपक्रम राबविण्यासाठी अद्यावत प्रगत ऑनलाईन अध्यापन पद्धती विकसित करून नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत कृती उपक्रम पोहचविणे व त्यातून कृतियुक्त अध्यापन राबिण्याची कार्यक्षमता (competencies) विद्यार्थांमध्ये विकसित करणे व योजनेसंदर्भात नियोजन व अध्यापन प्रक्रिया पुढील काही महिने ऑनलाईन पद्धतीने राबविणे हा उद्देश आहे.
विभागातील विद्यार्थ्यांचे व्हाटस अप ग्रुप तयार केले आहे व त्यानुसार विद्यार्थ्यांचे व्हाट्स अप गृप तयार करून योजनेसंदर्भात नियोजन सदर कोविड-१९ च्या प्रादुर्भावात पुढील काही महिने ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे.ज्यामध्ये योजना प्रमुख शिक्षक व मुख्याध्यापक व योजना प्रमुख हे व्हाटस अप चे ग्रुप अॅडमीन आहेत व त्याबाबत नियंत्रण व समन्वय घडवून आणण्याचे कार्य करित आहे. तसेच या ग्रुप मध्ये संसाधन साहित्य, कृती आराखडे, पोस्टर, बॅनर, माहितीपत्रके नवीन सूचना विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे वेळोवेळी अद्यावत केले जात आहे.
२६ जून-२०२० ते २२ जुलै-२०२० दरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरात आढळणारे व स्थानिक प्रजातीचे देशी बीज/ गावठी बीज एकूण संख्या २२४६७ इतके संकलित केले आहे. ज्यापासून पुढे रोपांची निर्मिती करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
शाळेनिहाय बीज संकलन व रोपवाटीकेचे बाबत माहितीचे फोटो पहावे.
पुढील नियोजन- वर्ष-२०२०-२१ हे जून-२०२० पासून शैक्षणिक वर्ष म्हणून शासन निर्णयानुसार
सुरुवात झाली आहे, परंतु कोविड-१९ सारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव हे जगातिक
संकट निर्माण झाले. परंतु या सर्व संकटावर मात करत योजनेचे कामकाज ऑनलाईन-
डीस्टन्स मोड ने सुरु करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी जास्तीत
जास्त स्थानिक प्रजातींच्या (देशी/गावरण/गावठी) बियांचे संकलन करून
१.बीज संकलन
२.बीज प्रक्रिया
३.रोपवाटिका तयार करणे.
या टप्प्याने पुढे जाऊन
जास्तीत जास्त स्थानिक प्रजातीच्या रोपांची रोपवाटिका तयार करण्याबाबत नियोजन केले गेले आहे.
विद्यार्थ्यांना अश्या
प्रकारचे उपक्रम पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण
देणारे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्य आणि स्वनिर्मितीचा आनंद
घेता येतो.
सदर कोविड-१९ च्या कालावधीत विद्यार्थ्यांनी
घरगुती पातळीवर असे उपक्रम राबविल्याने आनंददाई शिक्षणाची अनुभूती मिळण्यास नक्कीच
मदत होत आहे.
धन्यवाद...
जगदीश ठाकूर
प्रकल्प अधिकारी, नाशिक विभाग
पर्यावरण सेवा योजना
カジノ シークレット カジノ シークレット william hill william hill カジノ シークレット カジノ シークレット dafabet dafabet 메리트카지노 메리트카지노 484
ReplyDelete