स्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
Wednesday, 26 February 2014
प्रगती विद्यालय रहाटगाव,ता.जि .अमरावती
रोपवाटिका या मुख्य
विषयाला घेवून शाळेअंतर्गत काम करण्यात आले. छोटी रोपे तयार करण्याची सुरक्षित
जागा म्हणजे रोपवाटिका. नवीन वृक्ष
निर्माण करणे हा रोपवाटिकेचा मुख्य उद्देश असून प्रथम योजनाप्रमुखानी अमरावती
सामाजिक वनीकरण कार्यालयाला भेट देऊन रोपवाटिके संदर्भात संपुर्ण माहिती जाणून घेतली सोबतच कडूबदाम,
पारसपिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, बेल, आंबा यांच्या बिया संकलित
केल्या.
शाळेत प्रथम विद्यार्थांच्या मदतीने ४ कटले गावातील नदी
काठची गाळाची माती एकत्रित केली तसेच गावातील बकरीचे लेंडी खत व रेती एकत्रित करून
घेतली त्या मध्ये बी. एस. सी. पावडर चे मिश्रण केले
व समप्रमाणात गटा गटा नुसार विद्यार्थांना वाटून दिलेल्या प्लास्टिक बॅग मध्ये भरण्यात आले.
रोपवाटिकेतील पिशव्या भरणे,
१ ) रोपे तयार करण्यासठी सर्व साधारणपने १० सें.मी x२० सें.मी आकाराच्या पिशव्या वापरल्या
२) कॅरीबॅगला आधी छिद्रे पाडली जेणे करून अतिरिक्त पाणी
निघून जाईल.
३) वाळू, शेणखत गाळाची माती यांचे १:१:१ या प्रमाणात मिश्रण
पिशव्यात भरले अशा प्रक्रारे रोपे तयार करण्यात
आली.
४) या उपक्रमात ३००० रोपे तयार करण्यात आली.
रोपवाटिका |
रोपवाटिकेत तयार करण्यात
आलेल्या रोपांचे केलेले वृक्षारोपण
रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांचे केलेले वृक्षारोपण
Tuesday, 25 February 2014
वृक्ष
दत्तक संकल्पना
दिवसेंदिवस
उग्र रूप धारण करत असलेला जंगलतोडीचा प्रश्न, नष्ट होत चाललेले अधिवास, जागतिक
तापमान वाढ, हवामानातील बदल अशा समस्या आज निसर्गाचा समतोल बिगडू पाहत असताना पर्यावरण
सेवा योजनेमध्ये कार्यरत असलेली कोकण विभागातील न्यू इंग्लिश स्कूल वनगुळे ता.
लांजा जि. रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील जागेमध्ये स्थानिक
प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करून या सर्व प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्याचा
छोटा प्रयत्न केला. व त्याच प्रयत्नातून पुढे आलेली हि “वृक्ष दत्तक संकल्पना”.
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपलब्ध ५० झाडे हि “नेहरू युवा केंद्र” रत्नागिरी
यांच्याकडून देण्यात आली. या मध्ये आंबा, काजू, नारळ, ई स्थानिक प्रजातींच्या झाडे
समाविष्ट होती. लांजा तालुक्याचे तहसीलदार श्री. ठाकूर, गावच्या सरपंच सौ.
मेस्त्री, मुख्याध्यापक या मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः वृक्षारोपण केले. नंतर
विद्यार्थ्यानी देखील उत्स्फूर्तपणे सर्व रोपांची शास्त्रीय पद्धतीने खड्ड्यात
लागवड केली. लागवड केलेल्या झाडांच्या भोवती विद्यार्थ्यांनी पालापाचोळ्याचा थर
दिला जो की पाण्याची वाफ होण्याचे थांबवून खड्डयामध्ये पाणी साठवून ठेवण्यास मदत
करतो तसेच कुजल्यानंतर तोच खत म्हणून झाडास प्राप्त होतो. विद्यार्थ्यांनी नंतर
आजूबाजूच्या परिसरातून टाकावू वाटणाऱ्या काटक्यांचा वापर करून प्रत्येक झाडास
कुंपण तयार केले.
प्रकल्प
प्रमुखांनी त्या वृक्षांचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव व जबाबदारी असलेल्या
विद्यार्थ्यांची नावे असा फलक विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला व तो प्रत्येक
कुंपणास लावले. “एक मुल एक झाड” अशी जबाबदारी नेमून दिल्यामुळे ‘माझे झाड’ ही
भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यास मदत झाली.
योजना
प्रमुख श्री. सर्जेराव पाटील यांच्या या अभिनव संकल्पनेला विद्यार्थ्यांच्या
प्रयत्नातून साथ मिळाल्यामुळे सदर उपक्रम शाळेत यशस्वीरीत्या राबविला जात आहे. हा
उपक्रम शाळेपुरताच मर्यादित न ठेवता याचा गावपातळीवर प्रसार करण्याचा शाळेचा प्रयत्न
राहील. पर्यावरण संवर्धनाकरिता शाळेने टाकलेले पहिले पाऊल खरच कौतुकास्पद आहे.
![]() |
वृक्षारोपण करताना तालुका लांजा चे तहसीलदार श्री ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. तावडे व ग्रामस्थ. |
![]() |
लागवड केलेल्या वृक्षांना पालापाचोळ्याचे आच्छादन करताना (पुरण) विद्यार्थी |
![]() |
सरंक्षणासाठी काटेरी कुंपण तयार करताना विद्यार्थी (up-right corner ) विद्यार्थिनी त्यांच्या दत्तक वृक्षांसोबत (down-left corner) |
![]() |
वृक्ष दत्तक संकल्पनेतील एक झाड |
![]() |
झाडा विषयीची माहिती दर्शवणारा फलक- स्थानिक नाव, शास्त्रीय नाव, वृक्ष दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे. |
Wednesday, 19 February 2014
नाशिक व जळगाव शिबीर-२०१४
आयुर्वेदिक वनस्पती गावामध्ये लागवड करण्यासाठी आणलेले रोपे , चिंचखेड हायस्कूल चिंचखेड.ता.दिंडोरी.जि.नाशिक |
नूतन ज्ञान मंदिर अडावद ,ता.चोपडा,जि.जळगाव येथील पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी |
औषधी वनस्पती पासून विविध प्रोडक्ट्स तयार करून दर्शविताना नूतन ज्ञान मंदिर अडावद ,ता.चोपडा,जि.जळगाव येथील पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी |
ग्रामस्थांसमोर विविध टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू दर्शविताना विद्यार्थी
|
भाऊसो.राजाराम गणू महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालय अभोडा,ता.रावेर,जि.जळगाव |
मनुदेवी ता. यावल वनक्षेत्र यावल पश्चिम,जळगाव येथे पक्षीनिरीक्षण अनुभवताना नूतन ज्ञान मंदिर अडावद ,ता.चोपडा,जि.जळगाव येथील पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी |
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु दर्शविताना, नूतन ज्ञान मंदिर अडावद ,ता.चोपडा,जि.जळगाव येथील पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी |
Nashik Division Camp 2014
आयुर्वेदिक औषधी वनस्पती लागवड, जनता विद्यालय कोऱ्हाटे,ता-दिंडोरी,जि-नाशिक |
Medicinal Plantation in Korhate Village
![]() |
औषधी वनस्पती लागवड संदर्भात जनजागृती प्रभातफेरी |
Rally
पर्यावरण सेवा योजना गट |
ESS Unit
कोऱ्हाटे गावात आयुर्वेदिक वनस्पती लागवड करतांना जनता विद्यालय कोऱ्हाटे येथील पर्यावरण सेवा योजनेच्या विद्यार्थी |
Plantation
ई-कचरा संदर्भात आसखेडा गावामध्ये जनजागृती प्रभातफेरी |
E-Waste awareness Rally in Askheda village
ई-कचरा जमा करतांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,आसखेडा ता.बागलाण जि.नाशिक येथील विद्यार्थी |
E-Waste Collection from Askheda Village
Monday, 10 February 2014
The Environment Department, Government of Maharashtra has initiated
the Environment Service Scheme for secondary and higher secondary
schools in the state, with the objective of providing students an
opportunity to explore and understand their local environment and
natural resources, and to undertake hands-on activities and action
projects for environmental improvement and conservation.
Subscribe to:
Posts (Atom)