Tuesday, 25 February 2014

वृक्ष दत्तक संकल्पना

दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असलेला जंगलतोडीचा प्रश्न, नष्ट होत चाललेले अधिवास, जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल अशा समस्या आज निसर्गाचा समतोल बिगडू पाहत असताना पर्यावरण सेवा योजनेमध्ये कार्यरत असलेली कोकण विभागातील न्यू इंग्लिश स्कूल वनगुळे ता. लांजा जि. रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील जागेमध्ये स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करून या सर्व प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्याचा छोटा प्रयत्न केला. व त्याच प्रयत्नातून पुढे आलेली हि “वृक्ष दत्तक संकल्पना”. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपलब्ध ५० झाडे हि “नेहरू युवा केंद्र” रत्नागिरी यांच्याकडून देण्यात आली. या मध्ये आंबा, काजू, नारळ, ई स्थानिक प्रजातींच्या झाडे समाविष्ट होती. लांजा तालुक्याचे तहसीलदार श्री. ठाकूर, गावच्या सरपंच सौ. मेस्त्री, मुख्याध्यापक या मान्यवरांच्या हस्ते प्रथमतः वृक्षारोपण केले. नंतर विद्यार्थ्यानी देखील उत्स्फूर्तपणे सर्व रोपांची शास्त्रीय पद्धतीने खड्ड्यात लागवड केली. लागवड केलेल्या झाडांच्या भोवती विद्यार्थ्यांनी पालापाचोळ्याचा थर दिला जो की पाण्याची वाफ होण्याचे थांबवून खड्डयामध्ये पाणी साठवून ठेवण्यास मदत करतो तसेच कुजल्यानंतर तोच खत म्हणून झाडास प्राप्त होतो. विद्यार्थ्यांनी नंतर आजूबाजूच्या परिसरातून टाकावू वाटणाऱ्या काटक्यांचा वापर करून प्रत्येक झाडास कुंपण तयार केले. 
प्रकल्प प्रमुखांनी त्या वृक्षांचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव व जबाबदारी असलेल्या विद्यार्थ्यांची नावे असा फलक विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतला व तो प्रत्येक कुंपणास लावले. “एक मुल एक झाड” अशी जबाबदारी नेमून दिल्यामुळे ‘माझे झाड’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यास मदत झाली.
योजना प्रमुख श्री. सर्जेराव पाटील यांच्या या अभिनव संकल्पनेला विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून साथ मिळाल्यामुळे सदर उपक्रम शाळेत यशस्वीरीत्या राबविला जात आहे. हा उपक्रम शाळेपुरताच मर्यादित न ठेवता याचा गावपातळीवर प्रसार करण्याचा शाळेचा प्रयत्न राहील. पर्यावरण संवर्धनाकरिता शाळेने टाकलेले पहिले पाऊल खरच कौतुकास्पद आहे.

वृक्षारोपण करताना तालुका लांजा चे तहसीलदार श्री ठाकूर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. तावडे व ग्रामस्थ.


लागवड केलेल्या वृक्षांना पालापाचोळ्याचे आच्छादन करताना (पुरण) विद्यार्थी  


सरंक्षणासाठी काटेरी कुंपण तयार करताना विद्यार्थी (up-right corner )
विद्यार्थिनी त्यांच्या दत्तक वृक्षांसोबत (down-left corner)
                                                                  
वृक्ष दत्तक संकल्पनेतील एक झाड


झाडा विषयीची माहिती दर्शवणारा फलक- स्थानिक नाव, शास्त्रीय नाव, वृक्ष दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे. 
                                                                          

No comments:

Post a Comment