प्रगती विद्यालय रहाटगाव,ता.जि .अमरावती
रोपवाटिका या मुख्य
विषयाला घेवून शाळेअंतर्गत काम करण्यात आले. छोटी रोपे तयार करण्याची सुरक्षित
जागा म्हणजे रोपवाटिका. नवीन वृक्ष
निर्माण करणे हा रोपवाटिकेचा मुख्य उद्देश असून प्रथम योजनाप्रमुखानी अमरावती
सामाजिक वनीकरण कार्यालयाला भेट देऊन रोपवाटिके संदर्भात संपुर्ण माहिती जाणून घेतली सोबतच कडूबदाम,
पारसपिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, बेल, आंबा यांच्या बिया संकलित
केल्या.
शाळेत प्रथम विद्यार्थांच्या मदतीने ४ कटले गावातील नदी
काठची गाळाची माती एकत्रित केली तसेच गावातील बकरीचे लेंडी खत व रेती एकत्रित करून
घेतली त्या मध्ये बी. एस. सी. पावडर चे मिश्रण केले
व समप्रमाणात गटा गटा नुसार विद्यार्थांना वाटून दिलेल्या प्लास्टिक बॅग मध्ये भरण्यात आले.
रोपवाटिकेतील पिशव्या भरणे,
१ ) रोपे तयार करण्यासठी सर्व साधारणपने १० सें.मी x२० सें.मी आकाराच्या पिशव्या वापरल्या
२) कॅरीबॅगला आधी छिद्रे पाडली जेणे करून अतिरिक्त पाणी
निघून जाईल.
३) वाळू, शेणखत गाळाची माती यांचे १:१:१ या प्रमाणात मिश्रण
पिशव्यात भरले अशा प्रक्रारे रोपे तयार करण्यात
आली.
४) या उपक्रमात ३००० रोपे तयार करण्यात आली.
रोपवाटिका |
रोपवाटिकेत तयार करण्यात
आलेल्या रोपांचे केलेले वृक्षारोपण
रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांचे केलेले वृक्षारोपण
No comments:
Post a Comment