पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पक्ष्यांसाठी घरटे बनविण्याची तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
मार्चपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागते. चालू वर्षी तर मार्चमध्येच तापमानाने ४० अंश से ओलांडले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता खूप असते. उन्हाळ्यामध्ये पूर्ण सोलापूर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले असतो. माणसासाठी वैयक्तिक स्तरावर किंवा शासन स्तरावर पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते. परंतु पक्षी आणि प्राण्याना पाण्यासाठी असे कोणतेही नियोजन केले जात नाही. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळे किवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होवू शकतो.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आठ शाळामध्ये पर्यावरण सेवा योजना राबविली जाते. यातील दिगंबरराव बागल विद्यालयात गेल्या तीन वर्षापासून ‘बर्ड रेस्टॉरंट’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये उन्हाळ्या दरम्यान पक्ष्यांसाठी अन्न, पाणी (पिण्यासाठी व आंघोळीसाठी) व कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करणे असा उपक्रम राबविले जातो. दोन वर्षापूर्वी शाळेच्या परिसरात काही पक्षी मृत अवस्थेत आढळले. विद्यार्थ्यी व शिक्षकांनी पक्ष्यांच्या मृत्यूची चिकित्सा केली असता असे लक्षात आले कि पाण्याच्या दुर्भिक्षामुळेच पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व बाबींचा शिक्षकांनी चर्चा केली व पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करण्याचे ठरवले व इथूनच शाळेच्या ‘बर्ड रेस्टॉरंट’ उपक्रमाची सुरुवात झाली. सदर उपक्रम फक्त शाळेच्या परिसरात न राबविता विद्यार्थ्यांनी गावात हि प्रभावीपणे राबविला आहे.
तालुक्यामध्ये एका शाळेत सुरु असलेल्या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्याचा विचार डोक्यात आला. याचबरोबर शिक्षकांनी राबविलेले उपक्रम इतरानाही कळावेत व अशा प्रकरचे उपक्रम इतर शिक्षकांनी त्यांच्या शाळेतही राबवावेत यासाठी कुंभेज येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून दिगंबरराव बागल विद्यालयातील योजना प्रमुख श्री. कल्याणराव साळुंखे सर व विद्यार्थ्यांनी काम पाहिले.
कार्यशाळेसाठी करमाळा तालुक्यातील सहा शाळेतून १४ शिक्षक व ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
![]() |
कार्यशाळेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना घरटे बनविण्याचे मार्गदर्शन करताना साळुंके सर |
![]() |
पक्ष्यांसाठी खाद्यपेटी बनविण्याचे मार्गदर्शन करताना श्री. साळुंके सर |
![]() |
कार्यशाळेत प्रत्यक्ष घरटी बनविताना शिक्षक व विद्यार्थी |
![]() |
घरटे कशी बसवावीत याचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी |
![]() |
कार्यशाळेबाबत प्रतिक्रिया देताना विद्यार्थी |
![]() |
कार्यशाळेस उपस्थित असलेले शिक्षक व विद्यार्थी |