पर्यावरण सेवा योजने अंतर्गत पक्ष्यांसाठी घरटे बनविण्याची तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.
मार्चपासूनच उन्हाळ्याची चाहूल लागते. चालू वर्षी तर मार्चमध्येच तापमानाने ४० अंश से ओलांडले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता खूप असते. उन्हाळ्यामध्ये पूर्ण सोलापूर जिल्हा पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले असतो. माणसासाठी वैयक्तिक स्तरावर किंवा शासन स्तरावर पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते. परंतु पक्षी आणि प्राण्याना पाण्यासाठी असे कोणतेही नियोजन केले जात नाही. उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या दुर्भिक्षामुळे किवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होवू शकतो.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील आठ शाळामध्ये पर्यावरण सेवा योजना राबविली जाते. यातील दिगंबरराव बागल विद्यालयात गेल्या तीन वर्षापासून ‘बर्ड रेस्टॉरंट’ हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये उन्हाळ्या दरम्यान पक्ष्यांसाठी अन्न, पाणी (पिण्यासाठी व आंघोळीसाठी) व कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करणे असा उपक्रम राबविले जातो. दोन वर्षापूर्वी शाळेच्या परिसरात काही पक्षी मृत अवस्थेत आढळले. विद्यार्थ्यी व शिक्षकांनी पक्ष्यांच्या मृत्यूची चिकित्सा केली असता असे लक्षात आले कि पाण्याच्या दुर्भिक्षामुळेच पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व बाबींचा शिक्षकांनी चर्चा केली व पक्ष्यांसाठी पाणी व अन्नाची व्यवस्था करण्याचे ठरवले व इथूनच शाळेच्या ‘बर्ड रेस्टॉरंट’ उपक्रमाची सुरुवात झाली. सदर उपक्रम फक्त शाळेच्या परिसरात न राबविता विद्यार्थ्यांनी गावात हि प्रभावीपणे राबविला आहे.
तालुक्यामध्ये एका शाळेत सुरु असलेल्या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्याचा विचार डोक्यात आला. याचबरोबर शिक्षकांनी राबविलेले उपक्रम इतरानाही कळावेत व अशा प्रकरचे उपक्रम इतर शिक्षकांनी त्यांच्या शाळेतही राबवावेत यासाठी कुंभेज येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून दिगंबरराव बागल विद्यालयातील योजना प्रमुख श्री. कल्याणराव साळुंखे सर व विद्यार्थ्यांनी काम पाहिले.
कार्यशाळेसाठी करमाळा तालुक्यातील सहा शाळेतून १४ शिक्षक व ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
![]() |
कार्यशाळेत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना घरटे बनविण्याचे मार्गदर्शन करताना साळुंके सर |
![]() |
पक्ष्यांसाठी खाद्यपेटी बनविण्याचे मार्गदर्शन करताना श्री. साळुंके सर |
![]() |
कार्यशाळेत प्रत्यक्ष घरटी बनविताना शिक्षक व विद्यार्थी |
![]() |
घरटे कशी बसवावीत याचे प्रात्यक्षिक दाखविताना विद्यार्थी |
![]() |
कार्यशाळेबाबत प्रतिक्रिया देताना विद्यार्थी |
![]() |
कार्यशाळेस उपस्थित असलेले शिक्षक व विद्यार्थी |
पर्यावरण सेवा योजना ही विद्यार्थी व आम्हा शिक्षकांना पर्यावरण जाणीव-जागृती ,प्रचार- प्रसार यासाठी अत्यंत प्रभावी व्यासपीठ देत आहे विचारांची देवाण घेवाण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य संनियंत्रण संस्था व आमचे मार्गदर्शक श्री सातव सर यांचे खूप खूप आभार !
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteयोजनेची खरी शक्ती शिक्षक व विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण मिळावे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. याचबरोबर आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत त्यांच्यावर पर्यावरणीय संस्कार झाले तर जबाबदार पिढी निश्चितच तयार होईल.
खुपच कौतुकास्पद आणि प्रेरनादाई उपक्रम आहे.राज्यातील सर्वच विद्यालायान्नी याचे अनुकरण केले तर राज्याचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही
ReplyDeleteधन्यवाद सर!
Deleteउन्हाळ्या दरम्यान पक्ष्यांसाठी अन्न, पाणी (पिण्यासाठी व आंघोळीसाठी) व कृत्रिम घरट्यांची व्यवस्था करणे असा उपक्रम राबविला जावा.खुपच प्रेरणादायी योजना आहे.आणि काळाची गरज आहे.आम्हाला योजनेतील सर्व व्यक्तींचा सार्थ अभिमान वाटतो.
ReplyDeleteधनयवाद सर ! असच प्रोत्साहन देत रहा.
DeleteThank you Sir
ReplyDelete