विद्यार्थ्यांनी साजरा केला पर्यावरणपूरक गणेशोत्सव
शाळेचे नाव – सुमति बालवन, गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे
सुमति बालवन शाळेमध्ये पर्यावरण सेवा योजना तीन वर्षापासून कार्यरत आहे.
शाळेमध्ये योजने अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यामध्ये
योजनेच्या माध्यमातून फक्त जनजागृती न करता प्रत्यक्ष कृतीमधून विविध गोष्टी
कशाप्रकारे बिंबवल्या जातील यावर मुख्याध्यापिका व योजना प्रमुखांचा भर असतो.
याचाच एक भाग म्हणून शाळेत प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक
गणेशोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी गाव परिसरात जावून पर्यावरणपूरक
गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यापुर्वी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून
शाडू मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर
कार्यशाळेस ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ८ विद्यार्थ्यांचा एक याप्रमाणे
विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी १३ गणपतीच्या शाडू
मातीच्या मूर्ती बनविल्या. मूर्तिकार श्री. चेतन यांनी शाडू मातीचे गणपती
बनविण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण
पूरक गणपती बनविण्याचा आनंद घेतला. सदर उपक्रम विद्यार्थी फक्त गणपती
बनविण्यापुरता मर्यादित ठेवणार नाहीत. विद्यार्थी या गणपतींची प्रतिष्ठापना शाळेत
व निवडक विद्यार्थ्यांच्या घरी करणार आहेत. लहानपनातच विद्यार्थ्यांनी पर्यावरण
संवर्धनात उचललेले पाऊल नक्कीच बहुमुल्य आहे.
सदर
उपक्रम राबविताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता गुळूमकर व योजना प्रमुख
सोनाली बगाडे मॅडम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
विद्यार्थ्यांना शाडू मातीचे गणपती बनविण्याचे मार्गदर्शन करताना मूर्तिकार चेतन
शाडूच्या मातीचे गणपती बनविताना विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी बनविलेला शाडू मातीचा गणपती
विद्यार्थ्यांनी बनविलेले शाडू मातीचा गणपती
शाडू मातीच्या गणपतीला पर्यावरणपूरक रंग देताना विद्यार्थी
रंग देवून झालेली गणपतीची मुर्ती
दैनिक लोकमतने सुमति बालवन शाळेने राबविलेल्या उपक्रमाची बातमी दि. २९/०८/२०१४ रोजी प्रसिद्ध केली.
No comments:
Post a Comment