टाकावू वस्तूपासून शाळेच्या परिसरातील झाडांना कुंपण तयार
करणे
शाळेचे नाव – सावित्री कन्या प्रशाला, रानमसले, ता. उत्तर
सोलापूर, जि. सोलापूर
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे हा पर्यावरण सेवा योजनेतील एक मुख्य कृती
कार्यक्रम आहे. याचबरोबर स्थानिक प्रजातीच्या वृक्षांचे बीज संकलन करणे, रोपवाटिका
तयार करणे व वृक्षारोपण करणे हा सुद्धा प्रमुख उपक्रम आहे. योजने अंतर्गत
अत्तापर्यंत शाळेने वृक्षारोपण केले होते, परंतु परिसरातील जनावरे लागवड केलेल्या
रोपांची नासधूस करत असत. त्यामुळे लागवड केलेली रोपे जगू शकली नाहीत. या सर्व
बाबींचा मुख्याध्यापिका सौ. अनिता गरड, योजना प्रमुख श्री. संघपाल कांबळे व सहकारी
शिक्षकांनी विचार केला. त्याचबरोबर पुणे येथे पर्यावरण सेवा योजने (प.से.यो.)
अंतर्गत झालेल्या सहविचार बैठकीत दिलेली वृक्षसंवर्धनाची कल्पना शिक्षकांनी
प्रत्यक्षात उतरवली.
यामध्ये प्रथमतः योजना प्रमुख व प.से.यो. गटाने घराच्या परिसरात टाकून
दिलेल्या बांबूच्या लाकडे एकत्रित केले. एकत्रित केलेले लाकडे योग्य मोजमाप घेवून
कापून घेतले. कापून घेतलेली लाकडे रोपांभोवती
खड्डा खांदून रोवून घेतले. त्यानंतर विद्यार्थिनीनी घरातील खराब झालेल्या साड्या
एकत्रित करून रोपाभावती रोवलेल्या बांबूच्या लाकडांना गुंडाळल्या जेणेकरून कोणतेही
जनावर सहजरीत्या रोप खाऊ शकणार नाही.
योजना प्रमुख व विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत
केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. याचबरोबर गावातील ग्रामस्थांना शाळेत बोलावून सदर
उपक्रमाचा उद्देश व महत्त्व प.से.यो.तील विद्यार्थिनी समजावून सांगणार आहेत.
शाळेमार्फत गावात वृक्षारोपण केलेले आहे, सदर रोपांचे संवर्धन अशाप्रकारे करावे
याबाबत विद्यार्थिनी गावकऱ्यांना आवाहन करणार आहेत.
No comments:
Post a Comment