दसऱ्या निमित्त आपट्यांच्या रोपांचे वाटप
न्यू इंग्लीश स्कूल, सोलगाव ता. राजापूर जि. रत्नागिरी
दिनांक- ०१/१०/२०१४
============================== ===
"पर्यावरणाच लेणं, हेच खर सोनं"
या सुविचाराचे महत्व पटविण्यासाठी व लोकांच्या मनात ते रुजवून ठेवण्यासाठी सोलगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा एका छोटा, प्रायोगिक व लोकसहभागातून कृती उपक्रम. दोन दिवसावर आलेल्या दसऱ्याच्या सणानिमित्ताने प. से. यो.तील विद्यार्थ्यांनी आपट्याच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण केले. आपट्याची एकूण ६ रोपे घेऊन सरस्वती मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत योजनाप्रमुख श्री. सचिन पाटील सर यांनी थोडक्यात दसरा सणानिमित्त आपट्याच्या रोपावर होणाऱ्या नुकसानीबद्दल तसेच भविष्यात सदर संस्कृती, परंपरा व सण टिकून ठेवण्यासाठी आपट्यांच्या रोपांची लागवड व आवश्यक संवर्धन या विषयी माहिती व महत्व मांडले. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संदेश, महेंद्र, सुचिता व मीनल यांनी माहिती दिली. कार्यक्रमास प्रथम नागरिक सरपंच सौ. मायुरीताई कुळ्ये, उप सरपंच श्री. शशिकांत बाणे ग्रामसेवक श्री गौरक्षिणात शेलार सदस्य श्री सुनील गुरव, श्री प्रभाकर गुरव व श्री विकास गुरव तसेच शिक्षक श्री पंडित सर कर्मचारी श्री अजित गुरव व विकास गुरव यांनी वृक्षारोपणास खड्डा खोदण्यास मदत केली.
उपसरपंच, ग्रामस्थ, योजनाप्रमुख व विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती मंदिराच्या परिसरात एका आपट्याच्या रोपच रोपण केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता व वृक्ष संवर्धन व पर्यावरणाचे हित लक्षात ठेवून सण साजरे करण्याच्या विचाराची सुरुवात झाली.
![]() |
सरस्वती मंदिराच्या प्रांगणात उपस्थितीत ग्रामस्थांना आपट्याची रोपे भेट देताना पर्यावरण सेवा योजनेची टीम |
![]() |
आपट्याच्या रोपट्याचे रोपण करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थी व शिक्षक. |
![]() |
न्यू इंग्लिश स्कूल, सोलगाव शाळेतील "पर्यावरण सेवा योजना" गट व शिक्षकवृंद. |
न्यू इंग्लिश स्कूल, सोलगाव शाळेतील गटाने आपटा समजून कांचनचे झाड लावले आहे. सध्या शहरी बाजारातही आपट्याची पाने म्हणून कांचनाची विक्री होते.
ReplyDeleteआपटा आणि कांचन दोघांचे वनस्पती कुळ एकच आहे. आपटा आणि कांचन या झांच्या पानात आणि फुलात फरक असतो. आपट्याची पाने २ किंवा १ रुपयाच्या नाण्याच्या आकाराची असतात. कांचनाची पाने हाताच्या तळव्या एवढी मोठी होऊ शकतात.
कांचन वृक्षाची लागवड मुख्यत्वे त्याच्या मोठ्या सुंदर गडद गुलाबी रंगाच्या फुलांमुळे; शोभेसाठी केली जाते. आपट्याची फुले खूप छोटी आणि पांढऱ्या रंगाची असतात.