कोकण विभागातील पर्यावरण सेवा योजने अंतर्गत कार्यरत इंग्लिश स्कूल सोलगाव येथे २५ व २६ जानेवारी २०१४ रोजी दोन दिवसीय अनिवासी शिबीर संपन्न झाले.विद्यार्थ्यांनी "इ-कचरा" हा प्रमुख मुद्दा समोर ठेवून प्लास्टिक पिशव्यांचे सर्वेक्षण, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे ग्रामस्थांना वाटप, हातकागद बनविण्याचे कौशल्य आत्मसात करणे, पक्ष्यासाठी कृत्रिम घरटी तसेच खाद्यपेटी तयार करणे इत्यादी विषयांवर कृती उपक्रमातून सहभाग घेतला.
शिबिरासाठी योजनेतील ५० विद्यार्थी शाळेच्या आवारातील आंब्याच्या झाडाखाली जमले होते. दिनचर्या समजावून घेवून गटामध्ये विभागाण्यासारखी कृती कार्यक्रमासाठीची पूर्व तयारी केली.
 |
टाळ्या वाजवून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौतुक/स्वागत(हात उंचावून गोल फिरवून) करण्याचा अभिनव प्रयोग केला. |
नंतर विद्यार्थ्यांनी इ कचरा व पर्यावरण जनजागृतीसाठी ३ वाड्यामधून रॅली काढली. "इ-कचरा, आरोग्यास खतरा" यांसारख्या कधीच न ऐकलेल्या घोषणेच्या कुतूहलाने लोग घराबाहेर येवून रॅलीचा आढावा घेवू लागले.
 |
इ कचरा जनजागृती रॅली |
 |
इ कचरा जनजागृती रॅली |
 |
इ कचरा जनजागृती रॅली |
रॅली संपवून सर्व मुले गंगोबा मंदिर जो कि गावाचा मध्य समजला जातो त्या ठिकाणी जमली. ५ विद्यार्थ्यांचा एक गट असे १० गट ५ वाड्यांमध्ये विभागले व घरोघरी जावून "इ कचरा म्हणजे काय? कोणकोणत्या वस्तू इ कचऱ्यामध्ये येतात? इ कचऱ्याचे संभाव्य धोके काय?" इत्यादी विषयांची माहिती सांगून लोकांना घरामध्ये असणाऱ्या इ कचरा दान करण्याचे आवाहन केले. लोकांनाही दिलेली माहिती व एकंदरीत भविष्यातल्या या ब्राम्हराक्षसाचा रुद्र रूप समजल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक तर केलेच व आपल्या घरातील जो काही इ कचरा होता तो दान केला पण इथून पुढे इ कचरा हा उकिरड्यांवर न टाकण्याची ग्वाही हि दिली!
 |
गंगोबा मंदिरासमोर सर्व विद्यार्थी |
 |
इ कचरा हाताळताना योग्य ती काळजी "हँड ग्लोव्झ" वापरून घेण्यात आली. |
 |
इ कचरा दान करताना |
संकलित झालेला इ कचरा हा रत्नागिरीतील एखाद्या खेडेगावात अथवा पश्चिम घाटातील एका खेडे गावात इतक्या प्रमणात असू शकतो हे सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे होते. तसे पाहता हे एकूणच किमान प्रमाण आहे यात दुमत नाही!
 |
संकलित केलेला इ कचरा. |
२ तासांच्या संकलीकरणाच्या कृतीनंतर विद्यार्थ्यांनी जमा झालेल्या इ कचऱ्यामध्ये असलेल्या विविध प्रकारांचा दास्तैवाजीकरण गटामध्ये बसून केले.
 |
गट प्रमुखांनी मिळून सर्व गटांनी संकलीत केलेल्या इ कचऱ्याचे सविस्तर सांखिक माहिती दर्शवणारा फलक तयार केला. |
दुपारी मुलांनी डबा खाल्यानंतर शिबिराच्या उद्घाटनचा कार्यक्रम आयोजिला होता. शाळेच्या शालेय समितीचे तसेच पर्यावरण सेवा योजना समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, गावचे उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, सेवा निवृत्त शिक्षक व ग्रामस्थ या कार्यक्रमास आमंत्रित व उपस्थित होते. सोलगवाच्या बदलत्या भौगोलिक, वातावरणीय व पर्यावरणाच्या समस्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. बापट यांनी इ कचऱ्यावर उत्तम असे मार्गदर्शन उपस्थितांना केले,
 |
वैद्यकीय अधिकारी डॉ. बापट इ कचऱ्यावर मार्गदर्शन करताना. |
विशाल बंडबे या विद्यार्थ्याने उपस्थितांना प.से.यो. अंतर्गत केलेल्या कृती उपक्रमांची माहिती दिली. तसेच सकाळी केलेल्या इ कचरा जनजागृती, सर्वेक्षण व संकलीकरनातून समोर आलेली माहिती उपस्थितांसमोर ठेवली व आपल्या गावामध्ये इ कचरा संकलीकरनासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी तयार केलेली "इ कचरा पेटी" ग्रामपंचायत ला भेट दिली.
 |
विद्यार्थ्यांच्या स्वकल्पनेतून साकारलेली "इ कचरा पेटी", |
 |
इ कचरा पेटी भेट देताना उपसरपंच, वैद्यकीय अधिकारी, मान्यवर व विद्यार्थी प्रतिनिधी. |
हा सगळा औपचारिक कार्यक्रम संपविल्या नंतर विद्यर्थ्यांना भारतात एकंदरीत "इ कचऱ्याचे व्यवस्थापन" हे कसे चालते ते माहितीपटाद्वारे दाखविले. हे सर्व त्यांच्या या समस्येला घेवून समज विकसित करण्यात खूप उपयुक्त ठरले. त्यानंतर जैवविविधता, प्रजनन काळात पक्ष्यांचे नटणे-नाचणे या स्वभाव बदल विषयावर तसेच प्लास्टिक सारख्या गंभीर विषयाशी निगडीत माहितीपट दाखविले. शेवटी दुसऱ्या दिवसाची दिनचर्या सर्वाना समजावून पहिल्या दिवसाची सांगता झाली.
 |
संकलित इ कचऱ्यासोबत योजनेतील सहभागी विद्यार्थी, योजना प्रमुख श्री. सचिन पाटील व इतर शिक्षकवृंद |
दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून ठरल्या प्रमाणे आंब्याच्या झाडाखाली विद्यार्थी जमले. इतर सर्व विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत असताना हे निसर्गप्रेमी आपल्या अकथित कर्तव्य बजावण्यासाठी जमले हे खरोखरच प्रशंसनीय होते!
आज सर्वांनी मिळून ५ वाड्यातील एकूण प्लास्टिक पिशव्यांचा वापर किती हा शोध घेण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांनी एकरूपी माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षणाचा आराखडा सहविचारातून तयार केला कोणत्याही सर्वेक्षणाचा माहिती संकालीकारणाचा आराखडा हा प्राण! ठरल्याप्रमाणे विद्यार्थी वाड्यामधून प्रत्येक गटामध्ये ५ घरांची माहिती संकलित करून घेवून आली. याच दरम्यान माहिती गोळा केलेल्या घरातील प्रमुखांना एक कापडी पिशवी (विद्यार्थ्यांनीच शिवलेली) भेट दिली. प्लास्टिक पिशवी वापराची माहिती गट प्रमुखांनी एकत्रित करून ती सर्वांसोबत प्रदर्शित केली.
 |
प्लास्टिक पिशवी वापर सर्वेक्षणातून समोर आलेली सांखिक माहिती दर्शवणारा फलक. |
प्लास्टिक पिशव्यांना पर्यायी कापडी पिशवीचा वापर उपलब्ध करून प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी टाकलेले एक पाऊल.
शाळेमध्ये प्रत्येक वर्गात कोणत्या न कोणत्या कारणाने नेहमी तयार होणारा कचरा म्हणेजे "कागद". खिडक्याच्या खाली, बेंच खाली, आवारात असा सर्वत्र पसरलेला हा कचरा! परंतु याची हि व्यवस्था लावणे हे इतर कचऱ्यांप्रमाणे महत्वाचे. शाश्वत विकासाकडे घेवून जाणारे ३ R "REUSE-RECYCLE-REDUCE " मधील पुनर्चक्रीकरण म्हणजेच RECYCLING हा पर्याय वापरून दररोज उत्पन्न होणाऱ्या कागदी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ठरले. पुनर्चक्रित अथवा हातकागद बनविण्याच्या प्रक्रियेतून कागदी कचऱ्या पासून नवीन कागद तयार करणे सहज शक्य आहे. सदर प्रक्रियेचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्षित करून दाखविले व नंतर त्यांना प्रयोग करण्यास सांगितले. सदर उपक्रमातून स्वनिर्मितीच्या आनंदासोबतच पुनर्वापराचे महत्व पटविण्यात मदत झाली.
 |
हातकागद तयार करताना विद्यार्थी गट. |
पुढील अर्ध्या दिवसाच्या टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बनविण्याचे तंत्र समजून घेवून, प्लास्टिक सर्वेक्षनादरम्यान गोळा केलेल्या टाकावू प्लास्टिक डब्या(गाडीच्या ओईल, तेलाचे कॅन ई.) पासून घरटी बनविली. तसेच खाद्यपेटी बनविण्याचे तंत्रज्ञान हि समजून घेतले. सदर घरटी शाळेच्या आवारात बसविली असून त्याच्या उचित नोंदी (कोणता पक्षी भेट देऊन गेला, कोणत्या पक्ष्यांनी घरटे स्वीकारले ई.) विद्यार्थी ठेवत आहेत.
 |
तयार केलेल्या कापडी पिशव्या सोबत पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थी व योजना प्रमुख. |
दोन दिवसाच्या शिबिरांती असे लक्षात येत कि इ कचरा हि समस्या असो वा प्लास्टिक प्रदूषणाची समस्या हि शहरे अथवा गावां पुरतीच मर्यादित राहिली नसून ती सोलगाव सारख्या पश्चिम घाटात वसलेल्या कित्येक खेडे गावामध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे, विकासाचा दर पाहता वेळीच उपाययोजना न आखल्यास मोठ्या नुकसानाची शक्यता मुळीच नाकारता येणार नाही.