माध्यमिक विद्यालय मासोद शाळेतील विद्यार्थांनी जिल्हा- समन्वयक तसेच योजना
प्रमुख यांच्या उपस्थितीत सांडपाणी व्यस्थापन ह्या विषयाला धरून मासोद गावातील
घरांचे सर्वेक्षण केले, २५ घरांच्या सर्वेक्षणादरम्यान रहिवाशांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत.
त्यामध्ये मुख्यता सांडपाण्याचा निचरा कसा केला जातो. ग्रामपंचायतर्फे कुठली
व्यवस्था करण्यात आलेली आहे. किती घरांपुढे शोषखड्डे आहे ते बघण्यात आले.
सर्वेक्षणातून असे निघून आले की, ग्रामपंचायतर्फे विशेष अशी कुठलीही व्यवस्था
करण्यात आलेली नाही. नाल्या तयार करण्यात आलेल्या आहे परंतु त्यात कचरा पडलेला
आहे.
No comments:
Post a Comment