Thursday, 13 March 2014

कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशाला, लक्ष्मी रोड, पुणे



पर्यावरण सेवा योजने अंतर्गत राठी प्रशालेच्या विद्यार्थिनीनी महात्मा फुले भाजी मंडईतील  भाजी विक्रेते व ग्राहकांचा प्लास्टिक वापराबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे पुढचे पाऊल म्हणून प्रशालेच्या विद्यार्थिनीनी १५० कापडी पिशव्या बनवून भाजी विक्रेते व ग्राहकांना विकल्या, जेणेकरून प्लास्टिक वापर काही प्रमाणात कमी होईल, तसेच या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याकरिता विद्यार्थिनीनी ७०० कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. सदर उपक्रमात योजना प्रमुख सौ. स्मिता कुलकर्णी, मनीषा पाठक व पर्यावरण सेवा योजना गटाचा उत्साह उल्लेखनीय आहे.

No comments:

Post a Comment