कै. सौ. सुंदरबाई राठी प्रशालेच्या पर्यावरण सेवा योजनेतील विद्यार्थिनीनी महाशिवरात्रीचे औचित्य साधून बनेश्वर येथे जावून प्लास्टिक वापरू नये याबाबत जनजागृती केली व कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.
स्थानिक पर्यावरण व त्याच्याशी निगडीत समस्या प्रत्यक्ष सहभाग व कृती आधारे समजून घेणे व संवर्धनात सकारात्मक सहयोग देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन निर्णय क्र. इ.एन.व्ही.२०१०/प्र.क्र.८/ता.क.३ दिनांक १४ जानेवारी २०११ नुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी पर्यावरण सेवा योजना सुरू करण्यात आली आहे.
आमच्या प्रशालेत या शिवाय आणखी उपक्रम चालू असतात. एकदा प्रत्यक्ष भेट दिल्यास अंदाज येईल.
ReplyDeleteया blogspot च्या निमित्ताने इतर प्रशालेत का्य काम चालू आहेत हे समजले व आणखी उपक्रमांची माहिती समजली.