Wednesday, 19 March 2014

प्रगती विद्यालय रहाटगाव, ता.जि. अमरावती

२० मार्च जागतिक चिमणी दिवस, 

गेल्या कित्येक शतकापासून मानववस्ती जवळ तसेच घरांच्या आजूबाजूला मित्र बनून राहणाऱ्या चिमण्या गेल्या काही वर्षांंपासून कमी होत आहेत. चिमण्यांची संख्या का कमी होत आहे. चिमणी (House Sparrow) Passer domesticus ही प्रजाती जगभरात सर्वत्र परिचित आहे. वाढते औद्योगिकीकरण, विकास आणि शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षात चिमण्यांची संख्या कमी झालली आले. तसेच मागील काही वर्षांत झालेल्या संशोधनानुसार मोबाईल टाॅवर्स हे सुद्धा चिमण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. वाढती लोकसंख्या, सोबतच वाढते प्रदूषण, शेतात तसेच बागेत फवारली जाणारी किटकनाशके त्यामुळे बाधील होणारे चिमण्यांचे खाद्य, हा सुद्धा एक मोठा धोका चिमण्यांची संख्या कमी व्हायला कारणीभूत आहे.  
         २० मार्च 'जागतिक चिमणी दिवसा' निमित्त प्रगती विद्यालय रहाटगाव, ता. जि. अमरावतीच्या पर्यावरण सेवा योजना विद्यार्था गटासोबातच ४१० विद्यार्थांनी एकत्र येऊन चिमणीची प्रतिकृती तयार करून 'चिमणी वाचवा' हा संदेश दिला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चोपडे योजनाप्रमुख श्री. विनोद लेव्हरकर, यांच्या सहकार्याने विद्यार्थांनी चिमणीची प्रतिकृती उभारली.  या उपक्रमाला वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे डॉ. जयंत वडतकर, श्री. वेद पत्की यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. 





No comments:

Post a Comment